हिवाळ्यासाठी फॅशन टिप्स, अशाप्रकारे करा विटंर कलेक्शन !

वृत्तसंस्था
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

थंडीच्या कपड्यांमध्येही वेगवेगळे प्रयोग करता येऊ शकतात. जाणून घ्या कोणत्या प्रकारची फॅशन हिवाळ्यात करता येऊ शकते आणि फॅशनेबल राहता येऊ शकते. 

मुंबई : पावसाने निरोप घेतला आहे. आता सुरुवात झालेय ती थंडगार गुलाबी हवेच्या ऋतुची. हिवाळ्याला सुरुवात झाली असून जिकडे तिकडे थंडगार वातावरण पसरले आहे. त्यामुळे हिवाळ्यासाठी कशी वेगळ्या प्रकारची फॅशन करायची असा प्रश्न समोर येतोच. फक्त स्वेटरशिवायदेखील थंडीच्या कपड्यांमध्येही वेगवेगळे प्रयोग करता येऊ शकतात. जाणून घ्या कोणत्या प्रकारची फॅशन हिवाळ्यात करता येऊ शकते आणि फॅशनेबल राहता येऊ शकते. 

1. हिवाळ्यात स्लीवलेस, शॉर्ट किंवा क्रॉप टॉप घालणे अवघड होऊन जाते. मग स्वेटर घातले की टॉप ही झाकला जातो. किंबहूना हिवाळ्यात असे कपडे घालणं अनेकजण टाळतात. हिवाळ्यात Turtle neck किंवा High neck  चे टॉप वापरण्यासाठी हा सर्वात उत्तम काळ आहे. बॅगी आणि जास्तीत जास्त लुस अशा प्रकारचा turtle किंवा high neck टॉप घालून तुम्ही ट्रेंडी दिसू शकता. त्याच्या सोबत जीन्स किंवा पॅन्ट आणि बुट्स घालून लूक पूर्ण करता येईल. अशाप्रकारच्या टॉपवर लांब चैनीचे गळ्यातले शोभून दिसेल. या प्रकारच्या टॉपमुळे थंडी लागत नाही आणि तुम्ही फॅशनेबलही दिसता.

Image may contain: one or more people, people standing and shoes

(फोटो सौजन्य : Pineterest ) 

2. हिवाळ्यात तुम्ही स्कार्फ, स्टोल आणि शॉल सोबत प्रयोग करू शकता. त्यामुळे थंडीपासून बचावही होतो आणि लुकही चांगला दिसतो. लेयरिंगचे स्टोल आणि त्याचसोबत जॅकेट घाला. या लुकमुळे लोकांच्या नजरा तुमच्याकडे वळतील. स्कार्फमध्ये वेगवेगळे रंग ट्राय करा. रंगांमुळे तुमचं आउटफिट उठून दिसेल. तुम्ही घालत असलेल्या टॉपच्या रंगानुसार स्कार्फ किंवा स्टोलचा रंग निवडा आणि तो गळ्याभोवती गुंडाळा. हा हिवाळ्यासाठी एक उत्तम लूक आहे. 

Image may contain: one or more people, people standing and shoes

(फोटो सौजन्य : Pineterest ) 

3. थंडीमध्ये गुढघ्यापर्यंतचे कपडे किंवा शॉर्ट कपडे घालणं अवघड होतं. थंडीमुळे ते घालणं  अनेकजण टाळतात. पण त्यासोबत थोडसा ट्विस्ट करून तुम्ही फॅशन करू शकता. वन पीस, बॉयफ्रेंड शर्ट, शर्ट ड्रेस, लॉंग शर्ट हे घालताना कमरेमध्ये बेल्ट लावावा. त्याखाली फिटिंग ची अँकल लेंथ पॅन्ट आणि लेदर बुट्स घालावेत. हिवाळ्यातही अशाप्रकारे शॉर्ट ड्रेसेसचा वापर करुन तुम्ही ट्रेंडी दिसाल. 

Image may contain: 1 person, standing and shoes

(फोटो सौजन्य : Pineterest ) 

4. जॅकेट्स वापरण्यासाठी हिवाळा हा ऋतू अगदी योग्य आहे. जॅकेट किंवा कोट, त्याच्यासोबत गळ्यामध्ये स्कार्फ आणि कमरेला बेल्ट हे कॉम्बिनेशन तुम्हाला क्लासी लूक देईल. कोट किंवा जॅकेटच्या आतमध्ये टॉप शिवाय तुम्ही प्लेन सॉलिड रंगाच्या स्लीप किंवा टी बॅग घालू शकता. त्यामुळे संपूर्ण आउटफिट उठून दिसेल. जॅकेट किंवा कोट घालताना त्याचसोबत कानटोपीही घालता येईल. 

Image may contain: 1 person, standing, walking, shoes and outdoor

(फोटो सौजन्य : Pineterest ) 

5. काही ठिकाणी जास्त थंडी नसते. चेन्नई किंवा मुंबई अशा शहरांमध्ये त्यामुळे मोठमोठे जॅकेट किंवा कोट घालणं शक्य नसतं. अशावेळी तुम्ही श्रग वापरू शकता. त्याच कापड जाड नसतं त्यामुळे थंडी आणि गरमी जाणवत नाही. बाजारामध्ये वेगवेगळ्या रंगाचे आणि पॅटर्नचे श्रग उपलब्ध होतात. कोणत्याही प्रकारच्या शॉर्ट टॉप आणि जिन्सवर श्रग वापरा. 

Image may contain: 1 person, smiling, standing and shoes

(फोटो सौजन्य : Pineterest ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fashion tips for winter information in Marathi