'फादर्स डे'चा इतिहास : लेकीसाठी आई बनलेल्या बापामुळे सुरु झाला उत्सव

fathers day history
fathers day history

प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांच्या चांगल्या भविषयासाठी आयुष्यभर झटत असतात. मुलांना खूप कष्ट पडू नयेत म्हणून ते कामात स्वतःला झोकून देतात. भारतासह जगात सगळीकडे वडील आपली जबाबदारी पार पाडत जगाला सामोरं जाण्यासाठी मुलांना स्वतःच्या पायावर उभं करतात. त्याच वडीलांसाठी जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी जगभरात फादर्स डे साजरा केला जातो. फादर्स डेच्या इतिहासाबाबत थोडेसे मतभेद आहेत. तो पहिल्यांदा कधी साजरा केला याबद्दल दोन वेगवेगळे दाखले दिले जातात. 

इतिहासात पहिल्यांदा 1907 ला व्हर्जिनियामध्ये फादर्स डे साजरा करण्यात आल्याचं म्हटलं जातं पण याची अधिकृतपणे कुठेच नोंद नाही. मात्र त्यानंतर तीन वर्षांनी  पहिल्यांदा 1010 मध्ये अधिकृतपणे फादर्स डे साजरा केला गेला. पण दोन्हींचा उद्देश वडिलांची कृतज्ञता व्यक्त करणे हाच आहे. 

व्हर्जिनीयातील एका खाणीमध्ये झालेल्या स्फोटात 210 कष्टकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृतांना विशेष श्रद्धांजली वाहण्याचा निश्चय करण्यात आला होता. त्याच वर्षी 19 जून 1907 रोजी पहिल्यांदा कष्टकऱ्यांच्या मृत्यूनंतर शोक संवेदना व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा करण्यात आला. मात्र याची अधिकृत नोंद कुठेही नाही त्यामुळेच लोक सोनोरा स्मार्ट डोडने साजरा केलेला फादर्स डे पहिला असं मानतात.

सोनोरा स्मार्ड डोड ही लहान होती तेव्हा तिच्या आईचं अचानक निधन झालं होतं. त्यानंतर डोडचा सांभाळ तिचे वडील विलियम स्मार्ट यांनी केला. एक दिवस जेव्हा डोड प्रार्थना सभेसाठी उपस्थित होती तेव्हा चर्चच्या बिशपनी मातृशक्तीवर उपदेश केला. याने सोनोरा खूपच प्रभावित झाली. 

मदर्स डेच्या पार्श्वभूमीवर तिने फादर्स डे साजरा करण्याचा विचार केला. त्यानंतर 19 जून 1909 ला पहिल्यांदा सोनोराने फादर्स डे साजरा केला. तेव्हा लोकांनी तिची खिल्ली उडवली पण वेळोसोबत लोकांना वडिलांचे कर्तव्य, निस्वार्थीपणा आणि त्याग यांची जाणीव झाली. त्यानंतर सर्व लोक एकत्र येऊन 19 जूनला फादर्स डे साजरा करायला लागले.

अमेरिकेत 1924 साली तत्कालीन अमेरिकेत राष्ट्रपती केल्विन कोली यांनी फादर्स डे साजरा करण्यासाठी परवानगी दिली आणि त्यानंतर तो साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर चार दशकांनी 1966 मध्ये तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉनसन यांनी 1966 मध्ये ही घोषणा केली की दर वर्षीच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाईल. तेव्हापासून आजपर्यंत फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com