Holi 2023 : नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी पार्टनरसोबत अशी करा साजरी होळी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi Celebration Tips for Couples

Holi 2023 : नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी पार्टनरसोबत अशी करा साजरी होळी...

Holi Celebration Tips for Couples : होळी हा सण मनातले सगळे वाईट विचार काढून एकत्र येण्याचा, तक्रारी दूर करण्याचा आणि मस्ती करण्याचा सण आहे. या सणामध्ये लोक आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि कुटुंबातील सदस्यांना मिठी मारुन आपुलकी व्यक्त करतात आणि होळीच्या शुभेच्छा देतात. धुळवडीला एकमेकांना रंग लावून आपण सण साजरा करतो.

अशात जे नवविवाहित आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक सण पहिल्यांदा जोडीदारासोबत साजरा करणे खूप रोमांचक असते. त्यात लग्नानंतरची पहिली होळी खूप खास मानली जाते. नवविवाहित जोडपे एकमेकांना रंग लावतात आणि होळीच्या शुभेच्छा देतात यापेक्षा सुंदर काय असेल?

जर तुमचेही 8 मार्चपूर्वी लग्न झाले आहे आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पहिल्यांदाच होळी साजरी करत असाल तर काही रोमँटिक कल्पना फक्त तुमच्यासाठी...

होळी स्पेशल डिश

कोणत्याही सणाला स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. होळीच्या निमित्ताने तुम्ही काही खास नाश्ता किंवा दुपारचे जेवण बनवू शकता. जोडीदाराची आवड लक्षात घेऊन डिश बनवा. जर पहिली होळी तुमच्या आणि त्यांच्या आवडीच्या नाश्त्यासोबत असेल तर दिवसाची सुरुवात बेस्ट झाली समजा...

सर्वात आधी एकमेकांना रंग लावा

तुमच्या जोडीदाराला सर्वात आधी तुम्ही रंग लावा आणि त्यांच्याचकडून पहिल्यांदा रंग लावून घ्या आणि एकमेकांचे छान फोटो काढा आणि मग दुसऱ्यांना रंग लावायला जा.

एकत्र डांस करा

होळीच्या दिवशी धमाल-मस्ती असते. होळीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत डान्सही करु शकता. होळीच्या गाण्यांवर नाचण्याची गरज नसली तरी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत छान आणि रोमँटिक म्युझिकवरही नाचू शकता.

होळी भेट

लग्नानंतरची पहिली होळी स्मरणीय बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला खास भेटवस्तू देऊ शकता. भेटवस्तू महाग नसावी, पण त्यांच्या आवडीची आणि गरजेची असू शकते. जेव्हा जेव्हा तो भेटवस्तू बघेल तेव्हा तुम्हा दोघांनाही आपल्या पहिल्या होळीची आठवण होईल.

एकत्र वेळ घालवा

लग्नाआधी तुम्ही तुमच्या कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांसोबत अनेक वेळा होळी साजरी केली असेल. पण लग्नानंतर जोडीदारासोबत तुमची पहिली होळी आहे हे लक्षात ठेवा आणि यावेळी आपल्या जोडीदारासोबत होळी साजरी करा. संध्याकाळी रंग खेळल्यानंतर, पुरुष अनेकदा त्यांच्या मित्र किंवा नातेवाईकांमध्ये व्यस्त होतात. पण यावेळी जोडीदाराला साथ द्या.