व्हॉट्सअप ग्रुपचा आलाय कंटाळा? ग्रुप सोडण्यासाठी या आहेत 5 ट्रीक्स!

वृत्तसंस्था
रविवार, 8 डिसेंबर 2019

अनेकदा आपल्याला ग्रुप हा सोडावासा वाटतोच. पण, ग्रुप सोडायचा म्हणजे इतर सदस्यांना वाईट वाटतं. आज आम्ही तुम्हाला नको असलेले ग्रुप सोडण्यासाठी काही ट्रीक सांगणार आहोत !

मुंबई : व्हॉट्सअॅप हे आता फक्त अॅप राहिलेलं नसून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक बनलं आहे. सकाळी उठल्यावर आता सर्वचजण आधी फोनवर व्हॉट्सअॅप चेक करतात. मित्र परिवार, ऑफिसची मंडळी, नातेवाईक असा मोठा गोतावळा असतोच आणि त्यांच्यासोबत एखादा व्हॉट्सअॅप ग्रुप बनतोच ! ग्रुपमध्ये असलेले भरपूर लोक, त्यांचे न मोजता येणारे मेसेजस त्यामुळे अनेकदा आपल्याला ग्रुप हा सोडावासा वाटतोच. पण, ग्रुप सोडायचा म्हणजे इतर सदस्यांना वाईट वाटतं. आज आम्ही तुम्हाला नको असलेले ग्रुप सोडण्यासाठी काही ट्रीक सांगणार आहोत !

1. झोपेत चुकून झालं ! 
सकाळी लवकर किंवा दुपारी व्हाट्सएप ग्रुप लिव्ह करा. कोणी कारण विचारलं तर सांगा की, झोपेत लक्षात आलं नाही, आणि चुकून ग्रुप सोडला ! हे कारण सांगून तुम्ही स्वतःचा बचाव नक्कीच करू शकता. तुम्ही सेफ आहात जोपर्यंत तुम्हाला कोणी पुन्हा अॅड करत नाही ! 

Image may contain: 1 person, text

2. कारण ग्रुपमध्ये 'ती' आहे 
व्हाट्सएप ग्रुप म्हंटलं की मित्र मैत्रिनिंचा गोतावळा आलाच. शाळेतले, कॉलेजमधले आणि इतर फ्रँड्स अॅड होतात. आता यामध्ये तुमचा किंवा तुमची 'एक्स' असू शकते. ब्रेकअप झाल्यावर एक्ससोबत मैत्री ठेवणे जरा अवघडच होते. हेच कारण सांगून तुम्ही व्हाट्सएप ग्रुपपासून छुटकारा मिळवू शकता. 

Image may contain: 1 person, smiling, meme and text

3. बंद पडलेला ग्रुप
सगळेच ग्रुप अॅक्टिव्ह असतील असं नाही. काही दिवसांनंतर ग्रुपकडे दुर्लक्ष होते आणि कोणीच मेसेज करायची तसदीही घेत नाही. अशातच तो ग्रुप आहे हेही कोणाच्या लक्षात राहत नाही. हीच एक चांगली संधी आहे. ग्रुप लिव्ह केला तरी कोणाला कळणार नाही आणि कोणी विचारलं तर ग्रुप तसाही बंदच आहे हे सोयिस्कर कारणही सांगता येईल !

Image may contain: meme and text

4. ओ नो टेक्निकल एरर !
ग्रुप सोडण्यासाठी आणखी एक चांगलं कारण आहे ज्यामुळे तुम्हाला कोणी फार त्रासही देणार नाही. 'काही तांत्रिक अडचणींमुळे ग्रुप सोडावा लागला' असं कारण सांगून तुम्ही ग्रुप सोडू शकता. नवा फोन बदलला, काही टेक्निकल एरर आहे हे सांगितल्यावर कोणी जास्त प्रश्नही विचारणार नाही. 

Image may contain: 1 person, text

5. खंर खंर सांगून टाका की...
साधा आणि सोप्पा मार्ग म्हणजे खरं सांगून टाका ! कामात व्यस्त असल्यामुळे ग्रुपचे मेसेज पाहण्यासाठी वेळ नसतो आणि फारसा सहभाग घेणे शक्य नाही असा मेसेज करुन, सर्वांना माहिती देऊन ग्रुप लिव्ह करा. खरं कारण सांगितल्याने ग्रुपमधील इतर सदस्य वारंवार कारण विचारणार नाहीत ! 

Image may contain: 1 person, text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five Clever Ways To Leave annoying Whats app Groups