Arrange Marriage ला सक्सेसफुल बनवण्यासाठी फॉलो करा हे गोल्डन रूल्स, लोकसुद्धा म्हणेल काय जोडी आहे...l follow these golden rules in arrange marriage it will lasts lifetime relationship tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrange Marriage

Arrange Marriage ला सक्सेसफुल बनवण्यासाठी फॉलो करा हे गोल्डन रूल्स, लोकसुद्धा म्हणेल काय जोडी आहे...

Arrange Marriage Golden Rules : अरेंज मॅरेज मध्ये सर्व काही पूर्वनियोजित असल्याने काहीही समस्या येत नाही असा बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो. मात्र असे काही नसून प्रत्येक नातं टिकवण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. तेव्हा अरेंज मॅरेज सक्सेसफुली टिकवण्यासाठी हे काही गोल्ड रूल्स तुम्ही फॉलो केलेत तर तुम्हीही तुमचं नातं यशस्वीपणे टिकवू शकता. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

हल्ली न्यू जनरेशनला अरेंज मॅरेज ही कॉन्सेप्ट फारशी पटणारी नाही. अरेंज मॅरेजपेक्षा त्यांचा लव्ह मॅरेजवर जास्त विश्वास असतो. कारण या नात्यात दोघांनाही त्यांच्या स्वभावगुणांबाबत आणि सवयींबाबत सगळे आधीच माहिती असते. मात्र तुमचे अरेंज मॅरेज झालेय म्हणून तुमचं नातं जपण्यात तुम्हाला अडचणी येतील असे नाही. तुम्ही हे गोल्डन रूल्स फॉलो करत तुमचं अरेंज मॅरेजसुद्धा तेवढंच यशस्वीरित्या टिकवू शकता.

लग्नाआधी एकमेकांना समजून घ्या

लग्न ठरल्यानंतर दोघांनीही एकमेकांना समजून घेणे फार महत्वाचे असते. जेणेकरून लग्नानंतर तुमचे एखाद्या गोष्टीवरून किंवा स्वभावगुणांवरून वाद होणार नाही. तुम्ही एकमेकांना आधीच समजून घेतले असल्याने तुम्हाला या नव्या नात्यात अॅडजस्ट व्हायलाही सोपं जाईल.

नव्या नात्यात जजमेंटल वागू नका

नव्या नात्यात तुम्ही लगेच जजमेंटल होऊ नका. कारण त्याने तुमच्यात वाद वाढतील. पार्टनरच्या काही भूतकाळातील चुकांमुळे तुम्ही त्याला वर्तमान काळात जज करु शकत नाहीत. असे केल्याने त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर झाल्याचे तुम्हाला दिसून येईल.

पार्टनरशी मनमोकळेपणाने बोला

लग्नाआधी तुमच्या पार्टनरशी तुमच्या मनातल्या शंकांबाबत मनमोकळेपणाने बोला. तसेच तुमच्या चर्चांमध्ये तुमचं मत अगदी ठामपणे व्यक्त करा. याचा फायदा तुम्हाला असा होईल की भविष्यात विविध विषयांवर चर्चा करताना तुम्हाला एकमेकांच्या मतांचा आदर करत नात्यात समतोल राखता येईल.

खरे तर सुखी वैवाहिक जीवनासाठी आधी मैत्री, मग प्रेम आणि नंतर लग्न करून आयुष्यभर एकत्र राहणे कधीही चांगले.

परंतु जरी तुम्ही आधी लग्नाची गाठ बांधली असेल, तरीही तुम्ही तुमच्या नात्यात आनंदी राहू शकता. प्रेमासाठी पाऊल पुढे टाकण्यापूर्वी तुम्हाला फक्त एकमेकांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराचा मित्र झालात तर तुमच्या नात्याला निश्चितच यश मिळेल.

पार्टनरशी चर्चा करून निर्णय घ्या

अ‍ॅरेंज्ड मॅरेजचा सर्वात मोठा दोष म्हणजे दोन्ही पार्टनरमध्ये एखाद्या निर्णयाला घेऊन मतभेद होतात. त्यामुळेच बहुतांश घरांमध्ये पतीचा निर्णय अंतिम असतो. अशा व्यवस्थेत पुरुषांना कोणतीही अडचण जाणवत नाही. मात्र महिलांना अनेक वेळा मन मारून जगावे लागते.

अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचा तुमच्याबद्दलचा आदर आणि स्वत:बद्दलचा स्वाभिमानही वाढेल, जे मजबूत नात्यासाठी आवश्यक आहे.