तणाव, चिंता व अस्वस्थतेतून अशी मिळवा मुक्ती; फक्त करा तीन काम

भीती आणि चिंतेची परिस्थिती अशी आहे की कोविडपासून स्वतःची आणि प्रियजनांची सुरक्षा ही जीवनाची पार्श्वभूमी बनली आहे
stress
stressstress

कोरोनामुळे अनेकांना तणावाने ग्रासले आहे. नोकरी गेली, व्यवसाय बुडाला अशा अनेक कारणांनी नागरिक चिंताग्रस्त झाले आहे. यामुळे तणाव, चिंता, अस्वस्थता अनेकजण अनुभवत आहे. पॉल मॅकेन्ना यांनी सांगितलेल्या गोष्टीचे (Do three things) पालन केले तर मन आणि मेंदू नवीन ऊर्जेने भरतील आणि तणावापासून आराम (Get relief from stress) मिळेल. पॉल मॅकेन्ना हे यूकेचे वर्तन वैज्ञानिक, दूरदर्शन आणि रेडिओ प्रसारक आहेत. त्यांनी अनेक स्व-मदत पुस्तके लिहिली आहेत.

भीती आणि चिंतेची परिस्थिती अशी आहे की कोविडपासून स्वतःची आणि प्रियजनांची सुरक्षा ही जीवनाची पार्श्वभूमी बनली आहे. काळजी घेणे चांगले आहे. परंतु, या भीतीने आयुष्य खूप कंटाळवाणे झाले आहे. तसेच आयुष्यात अस्वस्थता आणि चिंता वाढत आहे. मी कोणाच्याही आयुष्यातून तणाव दूर करण्याचा दावा करीत नाही. परंतु अशा काही युक्त्या शेअर करत आहे, ज्यामुळे भावनिक संतुलन स्थिर होईल आणि नकारात्मक भावना कमी होतील, असे पॉल मॅकेन्ना म्हणाले.

stress
७,५०० च्या आत मिळतील ५ स्मार्टफोन; कमी बजेटमध्ये उत्तम फीचर

विचार करण्याची पद्धत बदला

आपण काय विचार करतो हे महत्त्वाचे नाही, तर कसा विचार करतो हे महत्त्वाचे आहे. सर्व प्रथम स्वत:ला आरामदायक स्थितीत अनुभवा आणि ते दिवस आठवा जेव्हा तुम्हाला चांगले वाटत होते. जुन्या आठवणी आठवा जणू तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात. आपण जे पाहिले ते खरोखर पहा आणि आपण जे ऐकत आहात ते खरोखर ऐका आणि अनुभवा. नकारात्मकतेपासून दूर जाऊन सकारात्मकतेकडे वाटचाल करता येते. जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा जग कसे दिसते आणि जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा जग कसे दिसते ते अनुभवा. दोघांमध्ये फरक करा आणि स्वतःला सकारात्मक बनवण्याचा प्रयत्न करा.

मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा

भावना आपल्या भावनिक बुद्धिमत्तेचा भाग आहे. एखाद्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे हे कळावे हा त्यांचा उद्देश आहे. काही भावना अस्वस्थही असू शकतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत आनंदी असतो तेव्हा आपल्याला चांगले वाटते. त्याचप्रमाणे इतर काही भावना तुम्हाला अस्वस्थ करतात. भीतीची भावना सूचित करते की काहीतरी चूक होऊ शकते. म्हणून तयार राहा. राग आपल्याला परिस्थितीपासून दूर राहण्याचा संकेत देतो. अपेक्षित परिणाम न मिळाल्याने निराशा येते. सर्व भावना वेळोवेळी जाणवतात. जेव्हा राग, भीती, निराशा या नकारात्मक भावना येतात तेव्हा त्यांच्या शांतता, प्रेम, सहजता या विरुद्ध भावनांची कल्पना करा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

stress
आजीचे अवैध संबंध; अडसर ठरणाऱ्या ३ वर्षीय नातीची हत्या

स्वतःला विचारा

तुमचा आतील आवाज शोधा. स्वतःला विचारा ‘माझा आतला आवाज काय आहे?’ ते अनुभवा आणि पहा की तो आत्मविश्वासाने भरलेला आहे. हे ऐकणे सोपे आणि स्पष्ट आहे का? ते कमकुवत आहे की मजबूत? यानंतर वारंवार स्वत:ला सांगा, ‘सर्व काही ठीक, चांगले आणि सुंदर आहे.’ त्यानंतर तुम्हाला खूप बरे वाटेल. तुमच्या जीवनात सकारात्मक वाक्यांचा समावेश करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com