'लेडी बाहुबली'ची कमाल! सिलेंडर- बादल्या घेऊन करते वर्कआऊट

'लेडी बाहुबली'ची कमाल! सिलेंडर- बादल्या घेऊन करते वर्कआऊट

एकदा पाहाच या 'लेडी बाहुबली'चा अफलातून व्हिडीओ

कोरोनामुळे आपण प्रत्येकानेच घरात बसून बराच काळ घालवला आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक शहरांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला. त्यामुळे या काळात अत्यावश्यक सेवासुविधा सोडल्या तर सारं काही बंद होतं. या काळात जीम, फिटनेस सेंटर बंद असल्यामुळे अनेक फिटनेस फ्रिक लोकांची पंचाईत झाली होती. यापैकी काही जणांनी घरीच आपला वर्कआऊट सुरु केला. यामध्येच सध्या सोशल मीडियावर एका फिटनेस फ्रिक महिलेची चर्चा रंगली आहे. या महिलेने चक्क घरातील सिलेंडर, बादल्या यांच्या मदतीने स्वत: ला फिट ठेवलं आहे.(girl-in-sari-exercises-with-a-cylinder-viral-instagram-reels)

सध्या अनेक जण घरी राहून जॉगिंग, वेटलिफ्टिंग आणि योग करुन स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, या उलट एका महिलेने चक्क घरातील सामानाच्या मदतीने स्वत: फिट ठेवलं आहे. विशेष म्हणजे साडी नेसून ही महिला वर्कआऊट करतांना दिसून येतं.

'लेडी बाहुबली'ची कमाल! सिलेंडर- बादल्या घेऊन करते वर्कआऊट
माझा फिटनेस : लाभ म्युझिक थेरपीचा

सोशल मीडियावर चर्चेत येत असलेल्या या महिलेचं नाव Shaili Chikara असं आहे. Shaili घरातील बादल्या, सिलेंडर यांच्या मदतीने रोज वर्कआऊट करतात. या वर्कआऊटचे काही व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

दरम्यान, Shaili या आर्टिस्ट व फिटनेस कन्सलटंट आहेत. तसंच सोशल मीडियावर त्या विशेष लोकप्रिय असून त्यांचे इन्स्टाग्रामवर २ लाख ८८ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स असल्याचं पाहायला मिळतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com