तरुणींमध्ये वाढतोय ब्युटीपार्लरचा ट्रेंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

मेकअपचे प्रकार                     दर (रुपयांत)
रेग्युलर मेकअप                        ५०० ते ३०००
सायडर्स (नातेवाईक) मेकअप    १५००  ते २०००
एचडी, थ्रीडी मेकअप                ५०००  ते १००००
ब्रायडल मेकअप                      ५०००  ते २००००

सोलापूर : फॅशनच्या दुनियेत अपडेट राहण्यासाठी सर्वांचा कल नेहमी दिसून येत असतो. महाविद्यालयीन युवतींपासून ते महिला वर्गापर्यंत आणि नववधूपासून ते घरातील पाहुण्यांपर्यंत मेकअपकरिता मागणी वाढली आहे. 

"हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी

सध्या महिला आणि तरुणाईत आपले सौंदर्य अधिक खुलविण्याची क्रेझ वाढलेली आहे. यामुळे ब्युटी पार्लरच्या व्यवसायातील मागणी दिवसेंदिवस वाढतीय. पूर्वी फक्त नववधू पार्लरमध्ये जाऊन मेकअप करत असे. परंतु आता लग्न, सण-समारंभासह अन्य कार्यक्रमांसाठी नातेवाईकदेखील पार्लरमध्ये जातात. शहरात अनेक ठिकाणी, अपार्टमेंट, घरगुती पार्लरची संख्या जास्त दिसून येत आहे. हल्ली तरुणाईची वाढती क्रेझ बघून पार्लर नावारूपाला येत आहे. लग्नसराईमध्ये पार्लर व्यावसायिकाकडे तीन ते चार महिन्यांपासून बुकिंग सुरू असते. पार्लर व्यावसायिकांना मेकअपकरिता सोलापूरसह पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, हैदराबाद व अन्य ठिकाणाहून ऑर्डर मिळत आहेत.

असा सुरू झाला No Shave November! 

फॅशनच्या दुनियेत तरुणी आणि महिला वर्गाचा मेकअपकडे कल वाढला आहे. सौंदर्य खुलून दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. यामुळे आम्हालाही नेहमी अपटुडेट राहून नव्याने येणाऱ्या फॅशनकडे नेहमी लक्ष द्यावे लागते.
- रेखा पारेकर, ब्युटीपार्लर व्यावसायिक 

हिवाळ्यासाठी फॅशन टिप्स, अशाप्रकारे करा विटंर कलेक्शन !

नववधूसोबत आपलाही लूक मस्त दिसण्यासाठी हल्ली नातेवाईकही पार्लरमध्ये मेकअप करत आहेत. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे लग्नसराईमध्ये ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद मिळतो. 
- उमा गणपा, ब्युटीपार्लर व्यावसायिक 

"हेल्दी राहायचंय? मग 'या' टिप्स नक्की फॉलो करा!

मेकअपचे प्रकार                     दर (रुपयांत)
रेग्युलर मेकअप                        ५०० ते ३०००
सायडर्स (नातेवाईक) मेकअप    १५००  ते २०००
एचडी, थ्रीडी मेकअप                ५०००  ते १००००
ब्रायडल मेकअप                      ५०००  ते २००००

 

"PHOTOS : थ्रीडी कलाकृतीबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा... ​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girls and women is flowing beauty parlor trend