2020 मध्ये लागलेल्या चांगल्या सवयी आयुष्यभर पडतील उपयोगी!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 December 2020

2020 पर्यंत सर्व काही नार्मल होते. रोज सकाळी शाळा, कॉलेज, ऑफिसला जाणे. मित्र- मैत्रिणी, नातेवाईकांसोबत, बाहेर खाणे- पिणे, कुठेही हिंडणे-फिरणे सर्वकाही 2020 च्या
सुरवातीस सहज शक्य होते. कोणतीही बंधणे नाही, कशाचीही भिती नाही.  पण हे सारे चित्र  अचानक हळू हळू बदलत गेले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि हळू हळू अनेक गोष्टींवर बंधणे येऊ लागली.

2020 हे वर्ष सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरले आहे. 2020 मध्ये कोरोना विषाणुचा शिरकाव झाला आणि सर्व सामान्य माणसाचे जनजीवन विस्कळीत झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन, आर्थिक मंदी, बेरोजगारी सारख्या अनेक समस्यांचा सामना आपण 2020 मध्ये केला आहे.  2020 हे वर्ष अत्यंत कठिण होते आणि हे वर्ष विसरुन जावे असे वाटत आहे. तसे असले तरी 2020 मुळे आपल्याला काही अशा सवयी लावल्या आहेत ज्या आपल्यासोबत आयुष्यभर कायम राहतील.

2020 पर्यंत सर्व काही नार्मल होते. रोज सकाळी शाळा, कॉलेज, ऑफिसला जाणे. मित्र- मैत्रिणी, नातेवाईकांसोबत, बाहेर खाणे- पिणे, कुठेही हिंडणे-फिरणे सर्वकाही 2020 च्या
सुरवातीस सहज शक्य होते. कोणतीही बंधणे नाही, कशाचीही भिती नाही.  पण हे सारे चित्र  अचानक हळू हळू बदलत गेले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि हळू हळू अनेक गोष्टींवर बंधणे येऊ लागली. हिंडणे -फिरणे तस सोडाच पण, साधे शाळा, कॉलेज  आणि ऑफिसला जाणे देखील अवघड झाले.  मित्र- मैत्रिणी, नातेवाईकांसोबत खाणे-पिणे तर दुरच, पण रोजचे जेवणासाठी देखील प्रत्येकाला खूप काळजी घ्यावी लागत होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकानेच आपल्या दैनदिन जीवनात बदल केले आहेत. सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने लागू केलेले आपण रोजच्या जीवनातील  बऱ्याच सवयी बदललेल्या आहेत. हे बदल तात्पुरते नसून आता कायम आपल्यासोबत राहणार आहेत. 2020 मध्ये अंगी पडलेल्या या सवयी आपल्याला निरोगी आणि आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.  कोणत्या आहेत जाणून या सवयी घेऊ या......

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत काढले फोटो; दोन आरोपींना अटक 

रोग प्रतिकार शक्ती (Immunity)
2020 मध्ये लोकांना रोग प्रतिकार शक्ती असणे किती महत्त्वाचे आहे हे उमगले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती असणे अत्यंत महत्वाची आहे. फक्त कोरोनाच नव्हे तर कोणत्याही विषाणू आणि रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती गरजेची असते. त्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती जपण्याची आपल्याला सवय लागली आहे. 2020 पुर्वी रोग प्रतिकार शक्ती जपण्यासाठी आपण काहीच काळजी घेत नव्हतो.  2020 मध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आपण कायम दक्ष झालेलो आहोत. त्यामुळे 2020 मध्ये अंग वळणी पडलेली ही सवय आपल्याला कायम निरोगी आरोग्य राखण्यास उपयुक्त ठरणार आहे. 

Image may contain: text that says "सकाळ IMMUNE SYSTEM"

स्वच्छता (Hygine)
निरोगी आरोग्यासाठी रोग प्रतिकार शक्ती इतकीच महत्त्वाची असते स्वच्छता. 2020 पुर्वी आपण स्वच्छतेला इतके महत्त्व नव्हते जितके 2020 मध्ये आहे. आपल्या आस-पास असलेल्या परिसर वातावरण कायम स्वच्छ राहावे यासाठी 2020 मध्ये नागरिक सतर्क झाले आहे. 2020 मध्ये आपल्या घरासोबतच ऑफिस, बस, शाळा-कॉलेज, हॉटेल्सह सर्वच ठिकठिकाणी साफ-सफाईला महत्व दिले जात आहे. रोजच्या रोज साफ-साफाई करुन निर्जंतूकीकरण केले जात आहे. 2020 मध्ये आत्मसात केलेल्या स्वच्छतेच्या सवयीला नेहमीच कायम महत्त दिले जाणार आहे. 

Image may contain: one or more people and indoor

हौशी पर्यटकाने अन्न शिजवण्यासाठी लावली आग अन्...

सकस आहार (Healthy eating) 
निरोगी आरोग्यासाठी सकस आहार  अत्यंत गरजेचा असतो.  जंक फूड, फास्ट फूड, स्ट्रीट फूड हे चवीला चटपटीत लागत असले तरी आरोग्यासाठी घातक ठरत आहे. नियमित सकस आहार केल्याने  रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. 2020 मध्ये सकस आहार का गरजेचा आहे हे प्रत्येकालाच समजले आहे. त्यामुळे सकस आहाराला प्राधान्य दिले जात आहे. 2020 नंतरही नागरिकांना ही सवय कायम राहील.

Image may contain: 1 person, text that says "सकाळ"

व्यायाम (Exercise)
व्यायमाला आपल्याकडे नेहमीच महत्व दिले आहेत. परतुं 2020 मध्ये कोरोनाची साथरोगाचा प्रसार झाल्यामुळे नागरिकांमध्ये व्यायामाचे महत्त्वाचे आणखी वाढले आहे. निरोगी आणि सुदृड आरोग्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा आहे. आरोग्यासाठी व्यायामाकडे वळलेल्यांची ही चांगली सवय 2020 नंतर कायम राहणार आहे. 

Image may contain: 1 person, text that says "सकाळ"

हाथ स्वच्छ धूणे (Washing Hands)
 2020 पुर्वी  आपण फक्त काहीही खाण्याआधी किंवा जेवण बनविताना हात धूवत होतो. पण 2020 मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दर 20 मिनिटांनी हात स्वच्छ करण्याची वारंवार सुचना दिली जात आहे. बाहेरून आल्यानतंर किंवा बाहेरुन आलेल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यानंतर हात धुणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना काळातच  नव्हे तर ऐरवी देखील ही सवय महत्त्वाची ठरणार आहे. 2020 नंतर देखील अंगवळणी पडणार आहे.
Image may contain: one or more people, text that says "सकाळ"

फळे- भाज्या स्वच्छ धुणे
2020 पुर्वी फळे आणि भाज्या बाहेरुन आणल्यानंतर सर्वजण त्या धुवून वापरतीलच असे नव्हते. पण 2020 मध्ये कोरोनाच्या भीतीने आता प्रत्येकजण फळे- भाज्या स्वच्छ धूवून मगच वापरत आहेत. 2020 पर्यत गृहीणी सहसा भाज्या- फळे धुवून घेत असे पण, कोरोनाच्या भितीने आता सर्वजण भाज्या- फळे धूत आहेत. हॉटेल, फुड स्टॉलवर देखील याबाबत काटेकोर पालन केले जाते.
Image may contain: one or more people, fruit and food, text that says "सकाळ"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good habits learned in 2020 will last a lifetime