मुलांना 'या' पाच गोष्टी योग्य वयात शिकवा नाहीतर...

आपल्या मुलाचे चांगले पालनपोषणच करुन त्याला एक चांगला माणूस बनवायचे आहे.
मुलांना 'या' पाच गोष्टी योग्य वयात शिकवा नाहीतर...
Summary

आपल्या मुलाचे चांगले पालनपोषणच करुन त्याला एक चांगला माणूस बनवायचे आहे.

तुम्ही जर का या पाच गोष्टी तुमच्या मुलाला योग्य वयात शिकवल्या तर ते मुल आयुष्याच्या सगळ्या कसोटीवर टिकण्यासाठी सज्ज होतात. लहान मुलं खूप निरागस असतात. थोडक्यात काय तर ते मातीचा गोळा असतात. तुम्ही त्यांना जसा आकार देणार तसे ते घडत जातात म्हणजे शिकत जातात किंवा त्यांच्या आजूबाजूला म्हणजे कुटुंबात समाजात जे काही दिसते त्या गोष्टी ते आत्मसाद करण्याचा प्रयत्न करतात.

लहान मुलांचे संगोपन करणे ही पालकांची जबाबदारी आहे. आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आणि त्याला चांगले भविष्य देण्यासाठी पालक सर्वतोपरी प्रयत्न करतात. आपल्या मुलाला कोणतीही वाईट सवय लागू नये आणि त्याने भविष्यात मोठा माणूस व्हावा अशी त्यांची इच्छा असते. आपले मूल काही चुकीचे करत नाही ना आणि जे काही करत असेल त्यातून त्याच्या कुटुंबाचे व समाजाचे नुकसान होत नाही ना, हे पालकांनी निट लक्ष देऊन पाहावे.

मुलांना 'या' पाच गोष्टी योग्य वयात शिकवा नाहीतर...
प्रियकराला इतर मुलींशी गप्पा मारण्याचं व्यसन आहे? वाचा मानसोपचारतज्ञाचा सल्ला

आपल्याकडे असं म्हटलं जातं की, तुम्ही घराबाहेरील लोकांसोबत कसं वागता, कस बोलता, त्यावरून तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यावर काय संस्कार केलं आहे. हेच दिसून येतं असतं. म्हणून असे म्हटले जाते की पालक झाल्यानंतर, जबाबदारी खूप वाढते कारण आपल्याला आपल्या मुलाचे चांगले पालनपोषणच करुन त्याला एक चांगला माणूस बनवायचे आहे. काही सवयी आणि कौशल्ये आहेत जे पालकांनी आपल्या मुलाला शिकवलेच पाहिजेत.

या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही कौशल्यांबद्दल सांगणार आहोत.आम्ही ज्या गोष्टी सांगणार आहोत त्या तुमच्या मुलाचे जीवन चांगले बनवू शकतात.

1) सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे

आपल्या मुलाला प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक नजरेने पाहायला शिकवा. त्याला छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी राहायला शिकवा, जे मिळाले आहे त्यात समाधानी राहायला शिकवा.जगातील प्रत्येक दु:ख सुख हे सकारात्मकतेने दूर करता येतात.कारण माणसात जर सकारात्मक दृष्टिकोन असले तर तो प्रत्येक परिस्थिती टिकुन राहतो.

मुलांना 'या' पाच गोष्टी योग्य वयात शिकवा नाहीतर...
जोडीदाराची फसवणूक केल्याबद्दल पश्चाताप होतोय? या प्रकारे मागा माफी

2) मतभेद सोडवण्यासाठी तत्पर राहणे

अनेकांना अशी सवय असते की वाद घालताना ते समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. तुम्ही तुमच्या मुलाला समजावून सांगा की जेव्हा त्याचा एखाद्याशी वाद किंवा मतभेद होईल तेव्हा आधी समोरच्या व्यक्तीचा मुद्दाही तु समजून घेण्याचा प्रयत्न कर त्यामुळे तुला तुझी आणि त्याची बाजु निट कळेल आणि तो वाद कदाचित तिथेच थांबेल

3) स्वत: साठी उभे रहा

जेव्हा आपल्याकडुन काहीतरी चूक होते, तेव्हा कोणीही तुम्हाला साथ देणार नाही. अशा परिस्थितीत लोकांना आपला मुद्दा पटवून सांगण्याची सवय मुलांना लावा. माणसांला स्वत: साठी उभं राहता आलचं पाहिजे.

4) माफी मागणे

एखाद्याची क्षमा मागणे किंवा त्याला माफ करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. या दोन्ही गोष्टी करण्यासाठी खूप धैर्य लागते. तुम्ही तुमच्या मुलाला अशी सवय लावा की तो घडलेल्या जुन्या गोष्टी क्षणात विसरू शकेल आणि पुढे जाण्यावर आपलं लक्ष केंद्रित करू शकेल.

5) मदत करायला शिकवा

आपल्या मुलाला तुम्ही लहानपणी शिकवा की गरजुला मदत करावी आणि गरीब व्यक्तीसोबत वागतांना थोडी दया दाखवावी. आणि आपण जर कुणाला मदत केली तर त्याचा गाजावाजा करु नये.

6) टीम वर्क

लहानपणापासून तुम्ही तुमच्या मुलांना टीम वर्क करायची सवय लावा. घरात सर्व मिळुन एखादे काम आठवड्यातुन एकदा तरी करा त्यामुळे मुलांना टीम वर्कचे महत्त्व कळेल आणि याच गोष्टी भविष्यात त्याला उपयोगी पडेल.

मुलांना 'या' पाच गोष्टी योग्य वयात शिकवा नाहीतर...
दाढी वाढवणाऱ्या पुरुषांनी ट्राय करा हे तीन फेसपॅक, चेहरा राहील तजेलदार

7) मर्यादित गरजा ठेवणे

लहान मुलांना आधीपासुनच मर्यादित गरजा ठेवायची सवय लावली तर ते भविष्यात कधीच पैसाचा किंवा कोणत्याच गोष्टीचा अतिवापर करणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com