
Hair Care Tips : केस पांढरे,विरळ झालेत? मेहंदी नाही तर आवळ्याचा हेअर मास्क करेल मदत!
आवळा केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. शक्यतो बाजारात उपलब्ध असलेले आवळ्याचे तेलच आपण केसांसाठी वापरू शकतो. परंतू, ते थेट केसांमध्ये कसा वापरायचा याबद्दल लोकांना काही कल्पना नाही.
अनेक लोक केसांच्या वाढीसाठी आवळा पावडर किंवा त्याचा रस तेलात मिक्स करून लावतात. तर काही लोक कच्चा आवळा थेट केसांना लावतात. केसांवर कच्चा आवळा लावणे हे निरोगी केस मिळविण्यासाठी एक प्राचीन आणि प्रभावी मार्ग आहे.
कारण आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. त्यात असलेले अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील फायदेशीर आहेत.
हे गुणधर्म केवळ केसांतील कोंडा दूर करण्यास मदत करत नाहीत तर केस मजबूत आणि दाट बनवतात. कच्चा आवळा केसांना लावल्यानेही केस मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते.
कोरड्या आणि रूक्ष केसांसाठी हा रामबाण उपाय आहे. पण प्रश्न पडतो कच्चा आवळा केसांमध्ये कसा वापरायचा? जर तुम्हालाही तुमचे केस निरोगी ठेवायचे असतील तर आवळ्याचे हे उपाय नक्की करून पहा.
आवळा आणि तेल
तुम्ही आवळ्याची पेस्ट तेलात शिजवून केसांना लावू शकता. तुम्हाला आवळ्याची पेस्ट बनवावी लागेल. नंतर कढईत अर्धी वाटी तेल टाका, त्यात प्रथम कढीपत्ता टाका आणि शिजवा. त्यानंतर आवळा पेस्ट घालून काही मिनिटे शिजवा. हा हेअर पॅक तुमच्या केसांना लावा आणि 3-3 तासांनी धुवा.
आवळा पेस्ट
पेस्ट बनवण्यासाठी तुम्हाला २ कच्चे आवळे घ्यावे लागतील. ते खिसून घ्या. जर आवळे खूप कडक असतील तर तुम्ही त्यांना थोडावेळ पाण्यात उकळवून मिक्सरमध्ये टाकून पेस्ट बनवू शकता. ही पेस्ट तुम्ही थेट तुमच्या टाळूवर आणि केसांवर लावू शकता. केसांना लावून 3-4 तसेच राहूद्यात. त्यानंतर थंड पाण्याने आपले डोके धुवा.

आवळा पेस्ट
हेअर पॅक
आवळा, रीठा आणि शिककाई एकत्र पाण्यात उकळूण घ्या. तो चोथा मिक्सरमध्ये बारीक करा. ही पेस्ट चाळणीच्या मदतीने चाळून घ्या. ते थेट केसांना लावा आणि हेअर पॅक म्हणून वापरा. डोके धुण्यापूर्वी 20 मिनिटे लावा. यामुळे डोक्याची त्वचा साफ होण्यास आणि केस मजबूत होण्यास मदत होते.

आवळ्याचा हेअर पॅक