Hair Fall Control Tips: डोक्याची केसं गळून गळून घरात ढिग लागलाय? हा Hair Mask आहे जालिम उपाय! | Hair Fall Control: How To Make Hair Fall Control Mask | Kes galti var upay | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hair Fall Control Tips

Hair Fall Control: डोक्याची केसं गळून गळून घरात ढिग लागलाय? हा Hair Mask आहे जालिम उपाय!

Hair Fall Control Problem: केस आपल्या सौंदर्याचा अविभाज्य घटक आहेत. त्यातही काळेभोर, लांबसडक केस असतील तर ती तरूणी भाग्यशालीच समजले जाते.

कारण, लांब काळ्या मुलायम केसांच्या प्रेमात तरूणी तर आहेतच. पण अनेक तरूणांनाही आपल्या पत्नीचे लांब केस असावेत असं वाटतं.  

लांब केस ठेवणं तसं सोपं नसतं. कारण, केसांच्या अनेक समस्या केसांच्या लांबीच्या आडव्या येतात.

आजकालची लाईफस्टाईल, खाण्यापिण्यामुळे आणि बाहेरील प्रदूषणामुळे केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. तसेच आपले केस हळूहळू पातळ होत आहेत. अशावेळी तुम्ही ही टक्कलपणाचे शिकार होऊ शकता.(Hair Fall)

 केस गळण्याचे कारणे

  • ताणतणाव, अस्वस्थ आहार, यकृतातील समस्यांमुळे केस गळती होते.

  • केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीमुळे देखील केस गळण्याची समस्या उद्भवते.

  • स्टेरॉईड्सच्या नियमित वापरामुळे केस गळू लागतात.

  • औषधांचे हानिकारक प्रभावामुळे देखील केस करण्याची समस्या निर्माण होते.

  • हार्मोन्सच्या पातळीत बदल, बाळाला जन्म दिल्यानंतर बहुतेक स्त्रियांची केस गळती होते.

  • जुनाट आजार, शस्त्रक्रिया, गंभीर संक्रमण, शारीरिक ताण आणि इन्फेक्शनमुळे केस गळतात.

  • बऱ्याचदा अनियोजित जीवनशैलीमुळे देखील केस गण्याची समस्या उद्भवते.

केस गळतीसाठी औषधोपचार तर केलेच पाहजेत. पण, काही घरगूती उपायांनीही ही समस्या थांबवता येऊ शकते. आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो ना तेल ना शाम्पू तर तो आहे हेअर मास्क.

आजवर केसांसाठी केवळ मेहंदी आणि डाय लावणाऱ्या लोकांना हेअरमास्कबद्दल ऐकून विचित्र वाटेल. पण, या हेअर मास्कचे अनेक फायदे आहेत.  हा मास्क स्पेशली केसांची गळती थांबवण्यासाठी बनवण्यात आला आहे.

हेअर फॉल कंट्रोल मास्कच्या मदतीने आपले केस मजबूत, लांब, दाट आणि सुंदर होण्यास मदत होते, तर चला जाणून घेऊया हेअर फॉल कंट्रोल मास्क कसा बनवावा.

हेअर फॉल कंट्रोल मास्कचे फायदे :

  • यामुळे तुमचे केस मुळांपेक्षा मजबूत होतात

  • केल्याने केसांची वाढ वाढते

  • केस मऊ आणि चमकदार होतात

  • यामुळे कोंडा आणि खाज होण्याची समस्या दूर होते

  • रूक्ष केसांसाठीही हेअर मास्क फायदेशीर आहे.

हेअर फॉल कंट्रोल मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

- कडुनिंबाची पाने १०-१५
- फ्लॅक्स सीड्स २ चमचे

- मोहरी/एरंडेल तेल २ चमचे
- लवंग ५-७
- कॉफी पावडर १ चमचा
- पाणी १ ग्लास

हेअर फॉल कंट्रोल मास्क बनवण्यासाठी

- सर्वप्रथम पॅन घ्या त्यात एक ग्लास पाणी घालून गॅसवर गरम होण्यासाठी ठेवा.
- त्यानंतर त्यात कडुनिंबाची पाने, अलसीचे दाणे, लवंग, कॉफी आणि मोहरीचे तेल घालावे.हे - - - मिश्रण कमीत कमी ५-७ मिनिटे उकळू द्या.
- यानंतर गॅस बंद करून मिश्रण फिल्टर करून थंड होण्यासाठी ठेवा.
- आता तुमचा हेअर फॉल कंट्रोल मास्क तयार आहे.

हा मास्क कसा वापराचा

  • हेअर फॉल कंट्रोल मास्क घ्या आणि ते आपल्या केसांच्या मुळांना आणि लांबीवर लावा.

  • नंतर सुमारे 30 मिनिटे केसांमध्ये ठेवा.

  • यानंतर माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवून स्वच्छ करावेत.

  • चांगल्या परिणामांसाठी, आपण हा हेअर मास्क 2 आठवड्यातून एकदा वापरुन पहावा.