#HappySinglesDay : जाणून घ्या सिंगल असण्याचे फायदे

अक्षता पवार 
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

नेहमी मी माझ्या काही मित्रांना त्यांच्या पार्टनर्स बरोबर बघते, आणि तेव्हा मला एक प्रश्न पडतो कि मी सिंगल का आहे? पण सिंगल राहण्याचे फायदे जेव्हा मी अनुभवते तेव्हा मात्र मला खूप आनंद होतो. बहुदा म्हणूनच आमच्या सारख्याच सिंगल लोकांसाठी 'सिंगल्स डे' साजरा करण्यात येत असावा.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नेहमी मी माझ्या काही मित्रांना त्यांच्या पार्टनर्स बरोबर बघते, आणि तेव्हा मला एक प्रश्न पडतो कि मी सिंगल का आहे? पण सिंगल राहण्याचे फायदे जेव्हा मी अनुभवते तेव्हा मात्र मला खूप आनंद होतो. बहुदा म्हणूनच आमच्या सारख्याच सिंगल लोकांसाठी 'सिंगल्स डे' साजरा करण्यात येत असावा.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

जेवणानंतर या पाच गोष्टी करू नका

'सिंगल्स डे'? हो तुम्ही बरोबर ऐकत आहात. सिंगल्स डे'ची सुरुवात चीनमध्ये झाली होती. ११ नोव्हेंबर हा सिंगल्स डे अथवा 'बॅचलर्स डे' म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच या दिनानिमित्त सर्व सिंगल असलेले पुरुष सुटी घेऊन शॉपिंग करतात आणि आपल्या सिंगल स्टेटसचे सेलिब्रेशन करतात. चीनमधल्या नानजिंग विद्यापीठातील चार सिंगल मुलांनी या प्रथेची सुरवात केली होती. आपण सिंगल आहोत याचा अभिमान करा आणि मनसोक्त पाने सिंगल स्टेटस सेलेब्रेट करा, यामागचा खरा उद्देश होता. असो पण हा दिवस जगभरात सगळीकळे साजरी करण्यात येतो. तसेच बहुतांश मुलं आणि मुली 'सिंगल डे' उत्साहात साजरा करतात. आजकाल लग्नापूर्वी बॅचलर्स पार्टीचा ट्रेंड देखील जोमात चालू आहे. लग्नानंतर आपले सिंगल स्टेट्स कायम राहणार नाही म्हणून, या पार्टीचे नियोजन करण्यात येते.

रविवारी हे करा आणि आठवडाभर निश्चिंत रहा

काय आहे नो शेव्ह नोव्हेंबरची भानगड

काय आहेत सिंगल राहण्याचे फायदे?

  1. वेळ :  सगळ्यात पहिला फायदा म्हणजेच तुमचा वेळ. तुम्ही तुमचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचवू शकता. या वेळचा वापर  तुम्ही तुमच्या इतर करिअरसाठी, वाचनासाठी किंवा आराम करण्यासाठी करू शकता. 
  2. फिरण्याची संधी : स्वतंत्रपणे कुठे ही कधीही फिरायला जाऊ शकता. सोबत कोणी असो वा नसो आणि जरी कोणता मित्र व मैत्रीण असेल तर, आपल्या पार्टनरला त्यांची माहिती द्यावीच लागेल, असा काही प्रश्न तुमचा समोर नसेल. 
  3. फ्लर्ट : सिंगल असल्यास तुम्हाला फ्लर्ट करण्याचे पूर्ण स्वतंत्र मिळते. 
  4. मैत्री : मित्रांशी संबंध चांगले राहतात. तसेच जास्तीचा वेळ तुम्हाला आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर घालवता येतो. अशाने मैत्री घट्ट राहते. मात्र रेलशनशिपमध्ये असल्यास असे संबंध स्थापित होत नाही. कारण तुमचा पूर्ण वेळ हा तुमच्या पार्टनरलाच हवा असतो. 
  5. मनासारखं करण्याची संधी असते.
  6. सर्वांत महत्वाचे म्हणजेच तुम्ही तुमचा आनंद तुमच्या आवडीच्या कामांमधून मिळवू शकता. 

अशा या सर्व फायद्यांचा लाभ तुम्हाला पण मिळू शकतो, जर तुम्ही पण सिंगल असाल तर, आणि 'सिंगल डे' उत्साहात साजरा करू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy singles day benefits of being single in marathi