
Fashion Tips : शॉपींगचा प्लॅन आहे? या सोप्या टिप्स वापरा अन् आपले जुने कपडे अगदी ब्रॅंडेड बनवा!
Fashion Tips : कपडे खरेदी करणं प्रत्येकाला आवडतं २-३ महीने झाले की आपल्याला वाटत असतं की अरे.. आपल्याकडे तर कपडेच नाहीयेत आणि आपण शॉपिंग करतो. परिणामी आपण खूप खर्च करतो, बाजारात तर काय सतत नवीन नवीन फॅशन येत असतात, पण म्हणजे काय प्रत्येका फॅशन नुसार खर्च करत रहायचा का?
अजिबात नाही. असं करत राहिलात तर सेव्हींग्स होणार तर नाहीच पण उगाच कपड्यांच्या ढीग वाढेल. असा नाहक पैसा खर्च करु नका. त्यापेक्षा या सोप्या टिप्स वापरा म्हणजे तुम्ही तुमचे जुने कपडे वापरुही शकाल आणि तुमची बचत होईल.

Fashion Tips
१. बॉर्डर आणि पॅचवर्क
आपल्याकडे असलेल्या जुन्या साड्या, ओढण्या यावर असलेल्या बॉर्डर आणि पॅच कापून आपण त्यांना आपल्या पद्धतीने आपल्या क्रॉप टॉप, स्कर्ट, कुर्ती, ओढण्या किंवा प्लाझो वर लावू शकतात, शिवाय तुमच्या कॉटनच्या ओढणीला कापून तुम्ही त्याचे आपल्यासाठी खिसे सुद्धा बनवू शकतात.

Fashion Tips
२. डाय
सोशल मिडियावर सध्या डाय करण्यासाठीच्या अनेक टिप्स सांगणारे व्हिडिओ शेयर होता आहेत. आपल्या प्लेन पांढऱ्या टि शर्ट किंवा टँग टॉपवर दुसऱ्या कलरने किंवा अगदी मल्टी कलरने आपण डाय करु शकतो.

Fashion Tips
३. ब्लॉक प्रिंट्स
ब्लॉक प्रिंट्स ही आपल्या देशातली खूप जुनी पद्धत आहे, तुम्ही बाजारातून प्रॉपर लाकडाचे साचे आणून किंवा अगदी घरातल्या बटाटा, भेंडी किंवा अशा प्रिंट करण्याजोग्या वस्तु घेऊन सुद्धा आपल्या टॉप वर किंवा इतर कपड्यांवर ब्लॉक प्रिंट्स करू शकतात.

Fashion Tips
४. एम्ब्रोडरी
आपल्या जुन्या जीन्स किंवा डेनिम जॅकेट्स वरती तुम्ही छान एम्ब्रोडरी करुन नवीन डिझाईन तयार करु शकतात. आपल्या आवडीची डिझाईन किंवा नाव असं काहीही तुम्ही यावर तयार करु शकतात.