
Health Tips : पदार्थ गरमच चांगला लागतो? खरंय पण दुष्परीणाम जाणून घ्या नाहीतर...
Health Tips in Marathi: दिवसाची सुरुवात काहीतरी कोमट खाऊन किंवा गरम पाणी पिऊन करावी, असे सांगितले जाते. खासकरून हिवाळ्यात आपण अनेकदा गरम पदार्थच खातो. कधी गरम चहा, कधी कॉफी किंवा गरम सूप. पण शरीराला उष्णता देणारे अती उष्ण पदार्थ आपण खातो. ते खाणे योग्य आहे का? याचा विचार तूम्ही केलाय का?
नॉर्मल पदार्थ खाणे हे अतिउष्ण पदार्थांपेक्षा कधीही चांगले असतात. यामुळे तुम्हाला अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. खरं तर, बर्याच अभ्यासात असे आढळून आले आहे की खूप गरम पेयांचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
जास्त गरम पदार्थ खाणे किंवा गरम सूप पिणे शरीरासाठी घातक ठरू शकते. कारण, गरम पदार्थ खाल्ल्याने अन्ननलिकेला कर्करोगाचा धोका संभावतो.
कडक चहा पिणे, खूप गरम अन्न खाण्याची सवय असणे हे आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरते. त्यामूळे आपल्या घसा आणि अन्ननलिकेला इजा होऊ शकते. घशात होणाऱ्या जळजळीमूळे कर्करोगाच्या पेशी तयार होऊ शकतात.
जास्त गरम पेये सेवन केल्याने जिभेच्या भोवती असलेल्या भागालाही इजा होऊ शकते. गरम पदार्थ नियमितपणे पिणे आणि खूप गरम गोष्टी खाल्ल्याने जीभ वारंवार भाजू शकते.
याशिवाय यामुळे ओठांचे नुकसान होते आणि अनेक प्रकरणांमध्ये ओठ जळतात किंवा शारीरिकदृष्ट्या काळे होतात. खूप गरम शीतपेयांचे वारंवार सेवन केल्याने देखील छातीत जळजळ होऊ शकते.

अल्सर असलेल्या लोकांनी गरम पेये टाळली पाहिजेत. कारण, ज्यामुळे पेशींना थर्मल इजा होऊ शकते. गरम पेये नियमितपणे प्यायल्याने तुमच्या पोटाच्या पडद्यालानाही नुकसान होऊ शकते. खूप गरम चहा किंवा कॉफी प्यायल्याने गॅस्ट्रिक ज्यूस पातळ होतात. आणि आपल्या पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो.
पेय किती गरम प्यावे?
६० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम असलेले कोणतेही पेय खूप गरम मानले जाते. जेव्हा तुम्ही खूप गरम असलेल्या वस्तूंचे सेवन करता तेव्हा ते तुमच्या पेशींना जाळून आणि जळजळ करून नुकसान करते.
लोकांसाठी गरम अन्न घेणे महत्वाचे आहे. तसेच शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी गरम पेये पिणे आणि हिवाळ्यात गरम अन्न खाणे आवश्यक आहे.