Health Tips : तुम्ही एक महिना साखर खाल्लीच नाही तर काय होईल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Tips

Health Tips : तुम्ही एक महिना साखर खाल्लीच नाही तर काय होईल?

तुम्ही कोणताही कडक डायट फॉलो करा. कोणत्या ना कोणत्या मार्गाने साखर तूमच्या पोटात जातेच. सकाळच्या चहा-कॉफीपासून कोल्ड्रिंक्स, चॉकलेट्स आणि अगदी फळांच्या ज्यूसमधूनही साखर आपल्या शरीरात पोहोचते. काही प्रमाणात साखर शरीराला आवश्यक असते. पण, प्रक्रीया केलेल्या साखरेने अनेक रोग होतात.

साखर अनेक अन्नपदार्थांमध्ये वापरली जाते. ज्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे आजार जडतात. प्रत्येक डायटीशियन तूम्हाला साखरेपासून लांब राहण्याचा सल्ला देतात. जर तूम्ही महिनाभर साखर, साखरयुक्त पदार्थ खाल्ले नाहीत तर काय होईल?, याचा तूम्ही विचार केलाय का?, नाही ना आज त्याचबद्दल जाणून घेऊयात.

- साखरेमध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील चरबी वाढण्यात मदत होते. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते. जेव्हा तुम्ही तुमच्या आहारातून साखर काढून टाकता. तेव्हा तुमच्या कॅलरीजची संख्या कमी होते, ज्यामुळे वजन कमी होते.

- तज्ज्ञांचे असे मत आहे की, साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी देखील बिघडू शकते. ज्यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. जर तुम्ही आहारातून साखर काढून टाकली तर त्यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी कमी होण्यास सुरुवात होते.

- दिनक्रमातून साखर काढून टाकल्याने शरीरातील एनर्जीची पातळी वाढल्याचे तूम्हाला जाणवेल. साखरेचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी त्वरीत वाढते. ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. जेव्हा तुम्ही साखर कमी कराल तेव्हा तुम्हाला अधिक सतर्क आणि उत्साही वाटेल.

- साखरेचे प्रमाण कमी केल्याने तुमचा मूड देखील सुधारेल. कारण यामुळे शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. शुद्ध साखरेचे सेवन हृदयाच्या आरोग्यालाही हानी पोहोचवते.

- उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांमागे साखर हे प्रमुख कारण आहे. साखर कमी केल्याने तुमचे हृदयाचे आरोग्य सुधारू शकते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

- निरोगी हृदयासाठी निरोगी आतडे आवश्यक आहे. जास्त साखर खाल्ल्याने आतड्यात जळजळ होऊ शकते आणि फायदेशीर बॅक्टेरियाला हानी पोहोचू शकते. त्यामुळे पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि जुलाब यासारख्या समस्या सुरू होतात.

- जर तुम्ही महिनाभर आहारात साखरेचा समावेश केला नाही तर त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ लागतो. त्यामुळे तुम्ही साखर नसलेल्या आहारापासून सुरुवात करू शकता. मात्र, हा बदल तात्पुरता नव्हे तर दीर्घकाळ सुरू ठेवावा लागेल.