Diwali 2024 : अभ्यंगस्नान करताना अंघोळीच्या पाण्यात टाका या वस्तू, शरीरातील अनेक व्याधी होतील दूर

तुम्ही अभ्यंगस्नान करताना काही गोष्टी अंघोळीच्या पाण्यात घातल्या तर तुम्ही आरोग्यदायी अंघोळ करू शकता.
Diwali 2024
Diwali 2024esakal
Updated on

Diwali Pahat :

दिवाळीचा दुसरा आणि महत्त्वाचा दिवस आज आहे. आजपासून दिवाळीला धनत्रयोदशीपासून सुरूवात झाली असली तरी आज नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी सुर्योदयापूर्वी अंघोळ करणाऱ्या व्यक्तीला नरक यातना भोगाव्या लागत नाहीत,त्यामुळे यादिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे.

तुम्हीही सकाळी उठल्यावर अभ्यंगस्नान करणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. तुम्ही अभ्यंगस्नान करताना काही गोष्टी अंघोळीच्या पाण्यात घातल्या तर तुम्ही आरोग्यदायी अंघोळ करू शकता. तुम्ही अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू मिसळल्या तर तुमच्या शरीरात असलेले अनेक आजार दूर होतील. त्या वस्तू कोणत्या हे पाहूयात. (Diwali 2024)

कडूलिंब

त्वचेच्या अनेक विकारांवर कडुलिंब फायदेशीर आहे. फंगल इन्फेक्शनवर कडूलिंबाची पाने औषधासारखी काम करतात. याच्या नियमीत वापराने अनेक आजार दूर होतात.

Diwali 2024
Diwali 2024: पर्यावरणपूरक आकाशकंदिलांनी बाजारपेठेत भरले रंग

तुरटी

शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी तुरटी गुणकारी ठरते. तुरटी ही त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. त्यात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. तुरटी गढूळ पाणी स्वच्छ करायला मदत करते तसेच ती शरिरातील, त्वचेतील आजार बरे करते.

सैंधव मीठ

 आपल्या शरीराला अनेकदा दुर्गंधी येत असते. ही दुर्गंधी घालवण्यासाठी सैंधव मिठाचाही मोठा फायदा होतो. त्यासाठी साधं पाणी कोमट करून घ्यावं. त्यात सैंधव मीठ मिक्स करा. यामूळे शरीरातील दुर्घंदी दूर होते.

लिंबू

लिंबू हे आंबट रसाळ फळ असले तरी ते वजन कमी करणे, त्वचेसाठी, केसांसाठी गुणकारी ठरते. त्यामूळे अंघोळीच्या पाण्यात लिंबू मिक्स करून त्या पाण्याने अंघोळ करा.

Diwali 2024
Diwali Celebration: लोकल ट्रेनमध्ये दिवाळीचा उत्साह, आकाश कंदील अन् सजावट; मोटरमननं साजरी केली दिवाळी

ग्रीन टी आणि तूळस

ग्रीन टी पिण्यासाठी वापरतात. पण, त्याने अंघोळ करणेही फायद्याचे असते. दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी ग्रीन टीने केलेल्या अंघोळीचा चांगलाच फायदा होऊ शकतो. तसेच, आयुर्वेदीक औषधी तुळसही तुम्ही पाण्यात टाकू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.