हेल्दी राहायचंय? मग 'या' टिप्स नक्की फॉलो करा!

टीम ईसकाळ
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

निरोगी राहण्याचा सर्वांत उत्तम आणि विनामूल्य उपाय हा आपल्याच हातात आहे. यासाठी आपण आपल्या रोजच्या सवयींना बदलावं, लागणार आहे. काही सवयी बदलाव्या लागतील आणि काही सवयी आपल्याला असतील, याकडे लक्ष द्यावे लागले. 

आधुनिक काळात लोक निरोगी राहण्यासाठी कित्येकदा गोळ्या व औषधांचा मार्ग निवडतात. मात्र, यांचा उपयोग किती प्रमाणात होतो हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु, निरोगी राहण्याचा सर्वांत उत्तम आणि विनामूल्य उपाय हा आपल्याच हातात आहे. यासाठी आपण आपल्या रोजच्या सवयींना बदलावं, लागणार आहे. काही सवयी बदलाव्या लागतील आणि काही सवयी आपल्याला असतील, याकडे लक्ष द्यावे लागले. 

काय आहेत या सवयी?
नेहमी हात स्वच्छ ठेवा -

बाहेरून आल्यावर, एखाद्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर, शौचालयाचा वापर केल्यानंतर तसेच काही खाण्यापूर्वी हात नेहमी स्वच्छ धुवावे. घरी लहान बाळ असल्यास त्यांना स्पर्श करण्या पूर्वी आपले हात स्वछ आहेत की नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

Image result for washing the hands

घरातील स्वच्छतेवर नेहमी लक्ष ठेवा -
आजारांचा धोका नेहमी त्या लोकांना सर्वाधिक असतो ज्यांच्या घरात धूळ आणि कचऱ्याचा वावर जास्त असतो. तसेच स्वयंपाकघर आणि शौचालयच्या स्वच्छतेकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. यामुळे पोटदुखी, युरीन इन्फेक्शन सारख्या कित्येक रोगांचा वावर मानवी शरीरात होतो. या सर्व आजारांना टाळण्यासाठी घरातील स्वच्छतेवर महत्वाचे लक्ष ठेवण्यात यावे. स्वयंपाकघरातील अन्नपदार्थाना नेहमी झाकून ठेवावे, भांडे स्वच्छ ठेवावी, फ्रिज, ओव्हन आदी वस्तुंना देखील वेळोवेळी साफ करण्यात यावे. 

भाज्या व फळांचे आहार -
आपण काय खातो याचे भान नेहमी ठेवावे. रस्त्यावरील पदार्थांना आणि पेय पदार्थांचे सेवन टाळावे. नेहमी फ्रेश फळं आणि भाज्यांचेच सेवन करावे. 

Image result for fruits

मसाल्यांचे वापर -
चमचमीत पदार्थ सर्वांनाच आवडतात. परंतु,  त्यात पडणारे मसाले शरीरासाठी हानिकारक असतात. या मसाल्यांचा व तेलाचा कमीत कमी वापर करावा. अन्न पूर्णपणे शिजवूनच त्याचे सेवन करण्यात यावे. 

पोषक तत्व आहार -  पोषक आहार हा निरोगी राहण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. जेवणात सलाद, दूध, दही, हिरव्या भाज्या आदींचे सेवन करावे. स्वयंपाक व पिण्यासाठी शुद्ध पाणीचा प्रयोग तुम्हाला निरोगी ठेवण्याचे कार्य करते. 

जंक फूड - सध्या वाढत्या कामामुळे तसेच वेळेच्या कमतरतेमुळे  जंक फूड हा जेवणाचा सोपा उपाय मानला जातो. परंतू या पदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे व मसाल्यांमुळे, लठ्ठपणा आणि इतर समस्या निर्माण होतात. जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक आणि कृत्रिम साखरेचा वापर करीत बनवण्यात येणाऱ्या पदार्थांना टाळावे. तसेच रात्रीचे जेवण नेहमी कमी असावे याची देखील काळजी घ्या. 

योग - स्वस्थ शरीरासाठी पोषक आहारासोबत योग आणि व्यायाम सुद्धा गरजेचे आहे. मेडिटेशन केल्यास बुद्धी तीव्र होते. रोज किमान एक व्यायाम नित्य नियमाने करा. 

Image result for yoga

तुम्ही जिथे झोपता  किंवा आराम करतो, त्या खोलीला आणि जागेला नेहमी स्वच्छ ठेवा. शरीराचे रूटीन चेकअप करत राहा. यामुळे छोट्या आजारांवर त्वरित उपचार करता येतो. तसेच शरीरात वावरणाऱ्या मोठ्या आजारांचा धोका टळतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for healthy life follow these tips