esakal | तुमची रोगप्रतिकार शक्ती किती? हिमोग्लोबिनवरून सहज ओळखा

बोलून बातमी शोधा

तुमची रोगप्रतिकार शक्ती किती? हिमोग्लोबिनवरून सहज ओळखा
तुमची रोगप्रतिकार शक्ती किती? हिमोग्लोबिनवरून सहज ओळखा
sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्या दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आहारात सकस व पौष्टिक पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. डॉक्टरांनीदेखील कोरोना काळात कोणता डाएट प्लॅन फॉलो करावा ते सांगितलं आहे. परंतु, या दिवसांमध्ये आपणच आपली काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यातच आपली रोगप्रतिकारक शक्ती नेमकी किती आहे हे हिमोग्लोबिनच्या माध्यमातून ओळखता येऊ शकतं. मात्र, हे फार कमी जणांना ठावूक आहे. म्हणून हिमोग्लोबिनमधून रोगप्रतिकारक शक्ती कशी ओळखावी ते जाणून घेऊयात.

हिनमोग्लोबिनमधून ओळखा तुमची रोगप्रतिकारक शक्ती

कोणत्याही आजारपणात प्रथम हिमोग्लोबिन टेस्ट केली जाते. तसंच कोरोना झाल्यास आयजीजी अँटीबॉडी टेस्ट केली जाते. या टेस्टच्या माध्यमातून रुग्णाची इम्युनिटी क्षमता पाहिली जाते.विशेष म्हणजे यात करण्यात येणाऱ्या हिमोग्लोबिन चाचणीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती समजते. जर पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये १४ पेक्षा कमी हिमोग्लोबिन असेल तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे असं समजावं.

हेही वाचा: प्लेटलेट्स कमी होणं कोरोना नवं लक्षण?

रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी?

योग्य व सकस आहाराच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. यासोबतच व्यायाम करणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे याच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय?

शरीरात बरेच विषाणू व जीवाणू असतात. यातील काही शरीरासाठी गरजेचे असतात, तर काही घातक असतात. त्यामुळे या घातक विषाणूंसोबत लढा देण्याचं काम इम्युनिटी पॉवर करत असते. यामुळे शरीरात विषाणूंविरोधात लढण्याची ताकद या रोगप्रतिकारक शक्तीमधून मिळत असते.

झोप घ्या -

रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर योग्य झोप घेणे अत्यंत गरजेचं आहे. दिवसातून किमान ७ तास व्यवस्थित झोप झाली पाहिजे. जर झोप अपूर्ण झाली तर शरीरातील कॉर्टिसोल या हार्मोन्सचा स्तर वाढतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होते.

कोवळ्या उन्हात बसा -

कोवळ्या उन्हात बसण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक किंवा रनिंग करत असाल तर १५-२० मिनिटे कोवळ्या उन्हात बसा.

लसूण, आलं यांचा आहारात समावेश करा -

लसूण, आलं, अश्वगंधा यामधून रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. तसंच लिंबू, संत्री, मोसंबी या फळांमुळेही इम्युनिटी पॉवर वाढते.