होळीला पांढऱ्या ड्रेसमध्ये स्टायलिश दिसायचंय! या कपड्यांनी दिसाल हटके

रंग आणि आनंदाचा सण असलेली होळी काही दिवसांवर आलेली आहे.
holi fashion tips women dresses ideas
holi fashion tips women dresses ideasesakal

रंग आणि आनंदाचा सण असलेली होळी (Holi) काही दिवसांवर आलेली आहे. होळीचा सण खास करण्याच्या नियोजनात आता अनेक जण सहभाग होताहेत. होळी सेलिब्रेशन पार्ट्यांसाठी अनेक मुलींनी ड्रेस (Dress) सिलेक्शनला सुरुवात केलीसुद्धा असेल. होळीच्या निमित्ताने तुम्हीही यावेळी काहीशा स्टायलिश दिसण्याचा विचार करत असाल,तर तुम्ही आतापासूनच आयडियाज (Ideas) घेऊ शकता. होळीच्या दिवशी शक्यतो पांढरे कपडे घालण्याची फॅशन (Fashion) आहे. अशा परिस्थितीत, पांढऱ्या कपड्यांसह काही नवीन लूक ट्राय करण्यासाठी तुम्ही बॉलिवूडच्या (Bollywood) अभिनेत्रींपासून प्रेरणा घेऊ शकता. या सुंदर कपड्यांमध्ये तुम्ही स्टायलिश आणि ट्रेडिशनल दोन्हीही दिसाल.

holi fashion tips women dresses ideas
Happy Holi 2022 : जरा हटके; भारताशिवाय 'या' 8 देशात साजरी होते होळी

- होळीच्या दिवशी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं.कियारा अडवानीसारखं (kiara adwani) पांढऱ्या रंगाच्या एथनिक ड्रेससोबत पिवळ्या रंगाचा सिल्कचा दुपट्टा तुम्ही कॅरी करू शकता.

- पांढऱ्या फ्लोरल ड्रेससह सारा अली खानने (sara ali khan) येथे बीन प्रिंटेड दुपट्टा कॅरी केला आहे. साराचा हा ड्रेस होळीच्या पार्टींसाठी परफेक्ट आहे.

- होळीच्या दिवशी पारंपरिक लूक हवा असेल तर अनुष्का शर्माप्रमाणे (anushka sharma)चुडीदार सलवार आणि अनारकली कट कुर्तीसोबतही वाईड स्कार्फ कॅरी करु शकता.यामुळे तुम्हाला रॉयल लूक मिळेल.

holi fashion tips women dresses ideas
माय फॅशन : ‘व्यक्तिमत्त्वानुसारच कपडे परिधान करा’

- होळीच्या दिवशी रंग खेळण्यासाठी आरामदायी ड्रेस घालायचा असेल तर कतरिना कैफप्रमाणे (Katrina Kaif) तुम्हीही जीन्स शॉट्स आणि पांढऱ्या रंगाचे टीशर्ट कॅरी करू शकता.

- जर तुम्ही तरुण असाल आणि होळीच्या दिवशी साडीसोबत काही एक्सपेरिंमेंट करण्याचा विचार करत असाल, तर आलिया भट्टचा (Aliaa Bhatt)हा व्हाईट आणि फ्लोरल लुकही तुम्ही ट्राय करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com