Slim Figure : जगातील परफेक्ट स्लीम फिगरचा अवॉर्ड मिळवणारी अभिनेत्री, ना सर्जरी ना टॅबलेट; तरी परफेक्ट l hollywood actress kelly brook won title award the most perfect figure from the world she is natural beauty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Slim Figure

Slim Figure : जगातील परफेक्ट स्लीम फिगरचा अवॉर्ड मिळवणारी अभिनेत्री, ना सर्जरी ना टॅबलेट; तरी परफेक्ट

Slim Figure : अलीकडे तुमच्याकडील गुणवत्तेबरोबरच तुमचं परफेक्ट दिसणंसुद्धा नोटीस केल्या जातं. काही ठिकाणी तर तुमच्या अपियरंस वरुनच तुमचं सिलेक्शन केल्या जातं. महिला हल्ली परफेक्ट फिगर गेन करण्यासाठी वेगवेगळ्या सेलिब्रिटचा डाएट प्लान आणि कर्कआऊट टीप्स फॉलो करताना दिसतात. मात्र जगातील परफेक्ट स्मील फिरगचा अवॉर्ड कुठल्या लेडीला मिळालाय हे तुम्हाला माहितीये काय?

बॉलिवूडमध्ये (Bollywood) अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या फिटनेसवरुन त्यांच्या वयाचा अंदाज बांधणं कठिण होतं. यात मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या राय बच्चन, करिष्मा कपूर इतकंच काय तर माधुरी दीक्षित, हेमा मालिनी या अभनेत्रींचा फिटनेस तरुणींना लाजवेल असा आहे.

तुम्ही आजवर स्मीम फिगरसाठी बॉलीवूडच्या या अभिनेत्रींना आदर्श मानत असल्या तरी मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की यापैकी कुठल्याच अभिनेत्रींची परफेक्ट स्लीम फिगर नाहीये. याबाबत बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत हॉलीवूडच्या (Hollywood) एका अभिनेत्रीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रींनी वयाची चाळीशी पार केली आहे. 

या हॉलिवूड अभिनेत्रीचं नाव आहे केली ब्रुक (Kelly Brook). जगातील सर्वात परफेक्ट फिगरचा किताब तिच्या नावे बुक झालाय. तिच्या फिटनेसला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. केली ब्रुक आपल्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. 1997 मध्ये केली ब्रुक एका म्युझिक अल्बममध्ये झळकली आणि तिच्या सौंदर्याने संपूर्ण जगाला वेड लावलं. तिच्या सौंदर्याच्या चर्चा होऊ लागल्या. केली ब्रुक टीव्हीवर एका कार्यकर्माचं सूत्रसंचालनही करते. 

केलीला परफेक्ट फिगरचा किताब बहाल करण्यात आला आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे केलीने सुदंर दिसण्यासाठी आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवावर प्लास्टिक सर्जरी केलेली नाही. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्ससच्या एका रिसर्चनंतर 'केली ब्रुक'ला जगातील सर्वात परफेक्ट बॉडी असणारी महिला म्हणून घोषित करण्यात आलं. तिचं सौंदर्य बघून तरुणांनाही वेड लागेल इतकी सुंदर ती दिसते.

या नियमांनुसार केला गेला रिसर्च ?
हा रिसर्च करण्यासाठी एक नियमावली तयारी करण्यात आली होती. चेहऱ्याचा आकार, शरीर आणि केसांची लांबी, वजन या सर्व पॅरामीटरवर आधारित हा रिसर्च होता. (Exercise) या रिचर्समध्ये काही महिलांचा समावेश करण्यात आला होता. मात्र यात केली ब्रुकने बाजी मारली. हल्ली अभिनेत्री सुंदर आणि परफेक्ट दिसण्याठी शरीरावर वेगवेगळ्या सर्जरी करत असतात. मात्र केली ब्रुक याला अपवाद आहे. 

ब्रिटनच्या फॅशन मॅगझीनने FHM ने 2005 साली केली ब्रुकला 'सेक्सिएस्ट वूमन ऑफ द इयर' म्हणून नावाजलं होतं. फिटनेसबरोबर वैयक्तिक आयुष्यासातही केली ब्रुक चर्चेत असते. 2020 मध्ये वाढल्या वजनामुळे तिला ट्रोल करण्यात आलं. पण केली ब्रुकने कठोर मेहनत करत पुन्हा आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं. आणि परफेक्ट फिगरचा किताब जिंकत परत एकदा बाजी मारली. (Hollywood)