पायाच्या उपचारासाठी या पद्धतीचा वापर करा अन् आपले पाय सुंदर ठेवा

foot deto
foot detoe sakal

कोल्हापूर : पायाच्या सुंदरतेसाठी त्याची देखभाल करणे आवश्‍यक असते. पायाची देखभाल कशी करावी, कोण कोणती काळजी घ्यावी, याबाबत आपण काही टिप्स जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला सलूनमध्ये जाण्याची गरज नाही. घरातच तुम्ही स्वतः पेडिक्युअर करू शकता. जर तुम्ही पायाच्या देखभालीकडे पाहत नसाल तर तुम्हाला त्याबाबत काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण पायावरती प्रदूषित घटक मोठ्या प्रमाणात असतात आणि हळूहळू ते आपली सुंदरत कमी करतात. यासाठी सलूनला जाण्याऐवजी तुम्ही घरातच आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने उपचार करू शकता.

foot deto
नागपूरकरांनो सावधान! बाहेर फिरलात तर होणार कोरोना टेस्ट; १८ बाधित विलगीकरणात रवाना

फुटबाथ आवश्यक -

पायाची सुंदरता कायम ठेवण्यासाठी आठवड्यातून एक वेळा पाय स्वच्छ धुऊन घ्या. चांगल्या पद्धतीने स्वच्छता म्हणजे एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये शाम्पू किंवा बॉडी वॉश टाका. त्याचबरोबर तेलाचे काही थेंब त्यामध्ये टाका. वीस मिनिटे पाण्यामध्ये पाय भिजवून ठेवा. आणि त्यानंतर ब्रशच्या मदतीने पाय स्वच्छ करा.

वापरा फूट मास्क -

पाय स्वच्छ केल्यानंतर फूट मास्क वापरणे आवश्यक आहे. मास्क तयार करण्यासाठी केळी, लिंबूचा रस आणि खोबरेल तेल हे चांगल्या पद्धतीने मिक्स करा. या मिश्रणाने पायाला चांगल्या पद्धतीने लेप द्या. वीस मिनिटानंतर थंड पाण्याने पाय स्वच्छ धुवावे.

foot deto
यवतमाळच्या अभियंत्याने साकारले बहुपयोगी ‘व्हेंटीलेटर’; भारत सरकारच्या नोडल एजन्सींची मान्यता

नखे वेळेवर कापा -

पायाची नखे वेळेवर कापणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला नखे वाढवायची असतील तर ते दररोज स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आठवड्यातून एक वेळ नेलपेंट असल्यास ते काढून टाकने गरजेचे आहे. त्याठिकाणी तुम्ही पुन्हा नवीन शेड लावू शकता. असलेल्या नेलपेंट वरच पुन्हा नवीन नेल पेंट लावण्याची चूक करू नका यामुळे नखे खराब होतात.

एप्पल साइडर विनेगर फायद्याचे -

पायाला वारंवार घाम आल्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी एप्पल साइडर विनेगर फुट बात अत्यंत उपयुक्त ठरते. यासाठी एका बादलीमध्ये कोमट पाणी घ्या .त्यामध्ये काही एप्पल साइडर विनेगरचे काही थेंब टाका. त्यानंतर त्यामध्ये पाय थोडा वेळ टाकून बसा. जर तुमच्या पायाला काही जखम असेल तर त्याला हे पाणी लावू देऊ नका.

पायाची करा स्क्रबिंग

ज्या पद्धतीने आपल्या चेहऱ्याची स्क्रबिंग केल्यानंतर त्यावर असलेल्या मृत पेशी बाजूला होतात. त्याच प्रमाणे पायाचे स्क्रबिंग केल्यानंतर त्याठिकाणी असलेले मृत त्वचेच्या पेशी पासून आपली मुक्तता होते. यासाठी दोन चमचे ब्राउन शुगर आणि दोन चमचे जैतुन तेल घ्या. हे दोन्ही एकत्र करून ठेवा पाय थंड पाण्याने धुतल्यानंतर तयार केलेले मिश्रण दहा मिनिटे लावा आणि स्क्रब करा त्यानंतर पायाला फुट क्रीम अथवा मॉइश्चरायझर लावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com