Hornbill Love Story : प्रेम करावं तर हॉर्नबिल पक्षानचं; ही लव्हस्टोरी वाचाल तर रडू कोसळेल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hornbill Love Story

Hornbill Love Story : प्रेम करावं तर हॉर्नबिल पक्षानचं; ही लव्हस्टोरी वाचाल तर रडू कोसळेल!

प्रेम..संपूर्ण जगाला एकत्र बांधून ठेवण्याची ताकद असलेली भावना म्हणजे प्रेम. जगात या शब्दाला प्रतिशब्द निर्माण झाले आहेत. त्यांप्रमाणे प्रेमातही खरेपणा राहिला नाही. रशिया आणि युक्रेनमध्ये जे काही सुरू आहे ते पाहिल्यावर तर जगात प्रेम शिल्लकच नाहीय, असे वाटते.

एकमेकांप्रती द्वेष वाढल्याने दुरावा येतो आणि पती-पत्नीचं नातं संपुष्टात येतं. किरकोर कारणावरून घटस्फोटाची पायरी चढणाऱ्या लोकांसाठी आदर्श असलेली एक वेगळी प्रेमकथा आज पाहुयात. या प्रेमकथेत, त्याग, समर्पण, निष्ठा, काळजी असं सगळं आहे.

अद्भूत आहे हे प्रेम

अद्भूत आहे हे प्रेम

तुम्हाला माहितीय का पशू-पक्ष्यांच्याही प्रेमकथा असतात. या कथा केवळ प्रेरणादायीच नाहीत, तर त्या पहिल्यांदा ऐकल्यावर खऱ्याही वाटत नाहीत. अशीच एक प्रेमकथा ट्विटरवर पाहायला मिळाली.

हॉर्नबिल पक्षी भारतातील अनेक राज्यांमध्ये आणि प्रामुख्याने हिमालयाच्या जंगलात आढळतो. हॉर्नबिल हा केरळ आणि अरुणाचल प्रदेशचा राज्य पक्षी देखील आहे. हा पक्षी IUCN रेड लिस्टचा भाग आहे. हा पक्षी 50 वर्षांपर्यंत जगू शकतो.

मादी हॉर्नबिला जेवण भरवताना नर

मादी हॉर्नबिला जेवण भरवताना नर

हॉर्नबिल पक्षी आयुष्यभर फक्त एकाच जोडीदारासोबत राहतात. IFS परवीन कासवान यांनी या अतिशय सुंदर पक्ष्याची प्रेमकथा शेअर केली आहे.

हॉर्नबिलला 'जंगलाचा माळी' म्हणूनही ओळखले जाते. हॉर्नबिलची जोडी सहसा आयुष्यभर एकत्र राहते. ते एकत्र प्रवास करतात. जेव्हा निवारा शोधत असतात. तेव्हा ते एकत्र घराचाही शोध घेतात. झाडाच्या बुंध्यात असलेली एखादी छोटी खाच ते शोधतात आणि त्यात मादी आणि अंडी ठेवतात.

हॉर्नबिलची जोडी

हॉर्नबिलची जोडी

यानंतर नर पुढील चार महिने मादीला खायला आणून भरवतो. झाडाच्या त्या ढोलीतून केवळ मादीची चोच बाहेर येते. तो चार महिने तिला न पाहता तिची काळजी घेतो.

मादी अंडी घालते आणि पिलांना जन्म देते. तोवर हे असंच सुरू असतं. नर हॉर्नबिल बाहेरच्याच दुसऱ्या झाडावर आयुष्य काढतो.

नर हॉर्नबिलवर खूप जबाबदारी आहे. त्याला फक्त स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी जेवणाची व्यवस्था करावी लागते. नर हॉर्नबिल घरट्यापासून दूर जाऊ शकत नाही कारण घरट्याचे संरक्षण करण्याची जबाबदारीही त्याच्यावर असते. ते स्वत: घरट्यातून बाहेर पडून अन्न शोधत नाहीत. तर नराची वाट पाहतात. नर हॉर्नबिल घरट्यात परत न आल्यास संपूर्ण कुटुंब त्याची वाट पाहते. जर नर परतला नाही तर मादी आणि पिलेही जीव सोडतात.