हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी !

वृत्तसंस्था
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

थंडीमध्ये त्वचेची जितकी काळजी घ्याल तितकी सुंदर दिसेल. तुमच्या नाजुक स्किनला हिवाळ्यात जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. जाणून घ्या हिवाळ्यामध्ये त्वचेचं संरक्षण कशाप्रकारे करावे ! 

मुंबई : पावसाने निरोप घेतला आणि गुलाबी थंडीची हवा सुरू झाली आहे. कोणत्याही दुसऱ्या ऋतुपेक्षा हिवाळ्यामध्ये स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. वातावरण उष्णकतीबद्ध असल्याने आपली त्वचा थंडीमध्ये शुष्क होते. जाणून घ्या थंडीमध्ये त्वचेची कशाप्रकारे काळजी घ्यावी. थंडीमध्ये त्वचेची जितकी काळजी घ्याल तितकी सुंदर दिसेल. तुमच्या नाजुक स्किनला हिवाळ्यात जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. जाणून घ्या हिवाळ्यामध्ये त्वचेचं संरक्षण कशाप्रकारे करावे ! 

1. त्याची नमी कमी होते. त्वचेची नमी कायम राखण्यासाठी हिवाळ्यात पाणी पिणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त पाणी पिल्याने त्वचेची नमी कायम राहते आणि शरीर हायड्रेटेड राहते. 

Image may contain: 1 person, drink and close-up

2. त्वचा कोरडी पडू नये म्हणून क्रिम, मॉइश्चरायझर लावा. घरातून बाहेर पडताना लोशन नक्की लावा. बाजारात वेगवेगळ्या प्रकाराच्या क्रिम उपलब्ध असतात. तुमच्या त्वचेच्या टाइपनुसार किंवा त्वचेला सुट होण्याऱ्या घटकांनुसार क्रिम निवडा. 

3. रात्री झोपायच्याआधी हाता- पायांना, तळव्यांना खोबरेल तेल लावावे. हिवाळ्यात त्वचा ड्राय होते आणि भेगा पडतात. त्यामुळे अनेकदा अती ड्राय पडलेल्या त्वचेतुन रक्तही येते. त्यामुळे थंडीमध्ये खोबरेल तेल लावावे, ते त्वचेचं संरक्षण करण्यात मदत करते. त्वचेचा मुलायमपणा टिकुन राहतो आणि मऊ राहते. 

Image may contain: 1 person, close-up

4. थंडीमध्ये चेहऱ्यासाठी रोजच्यापेक्षा वेगळ्या क्रीम वापरावी. चेहऱ्याची त्वचा नाजूक असल्याने थंडीचा परिणाम लवकर होतो. चेहऱ्यासाठी कोल्ड क्रिम, ग्लिसरीन लावावे. चेहरा ड्राय न होण्यासाठी रात्री फेस ऑइल किंवा बदाम तेल लावावे. वेळच्या वेळी फेशिअल करावे. चेहऱ्याची आणि हातांची क्रिम ही वेगळी असते आणि वेगळीच वापरावी. कारण दोन्हीच्या त्वचेमध्ये फरक आहे. 

5. बॉडी लोशनसाठी कोको बटर आणि शिया बटर या प्रकारच्या क्रीमचा वापर करा. त्या त्वचेला ड्राय पडू देत नाहीत. शिवाय थंडीमध्ये काहीवेळा त्वचा काळी पडते. हे लोशन वापरल्याने त्वचेचं संरक्षण होतं. थंडीमुळे अंघोळीसाठी अनेकजण जास्तीत जास्त गरम पाणी घेतात. जास्त गरम पाणी त्वचेसाठी चांगले नाही. जास्त गरम पाण्याने त्वचा ड्राय पडते. साबणाचा वापरही शक्य तितका कमी करावा. हिवाळ्यासाठी खास स्क्रब बाजारात उपलब्ध होतात, ते वापरावे. 

Image may contain: 1 person, smiling, close-up

6. चेहऱ्यासाठी रात्री व्हिटॅमिन ई च्या ऑईलचा वापर करावा. 

7. थंडीमध्ये ओठ रुक्ष, सुखे पडून रक्तही येते. त्यासाठी ओठांना तूप लावावे. रोज बाहेर जाताना, ओठांना व्यासलीन लावावं.

Image may contain: one or more people and close-up

8.  गुडघे, कोपरे, घोटे हे इतर वेळी कोरडे असणारे शरीराचे भाग शरीरातील पाण्याच्या अभावाने अधिकच काळे पडतात, त्यांना भेगा पडतात. अंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रीमऐवजी केला जाऊ शकतो. 

9. त्वचेची देखभाल खरे तर आपला चेहरा नितळ, सतेज, निरोगी असावा यासाठी सर्व  प्रयत्न करत असतात.थंडीत घराबाहेर पडताना चांगले विंटरकेअर लोशन वापरावे. विंटरकेअर लोशन आयुर्वेदिक असेल तर उत्तमच. 

Image may contain: one or more people, close-up and indoor

10. काहीजणांना थंडीचा अधिकच त्रास होतो आणि पायाची त्वचा फुटते. असे होत असल्यास  कोमट पाण्यात रोझ वॉटर घालुन त्यात पाय थोडा वेळ ठेवावे. तसेच तुम्हाला जी क्रिम सूट होईल ती पायाला लावून त्यावर स्कॉस घालावेत. घरात असताना पायात स्लिपर घालावी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to care of skin in winter information in marathi