
आजही लग्नानंतर मुलींना आडनाव बदलावे लागते. या आडनाव बदलण्याचा मुद्दा आजकाल इतका मोठा झाला आहे की त्याच्या व्यावहारिक बाबींकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे.
पुणे : आजकाल अनेक मुली लग्नानंतर पूर्वीचे म्हणजे माहेरचे आडनाव वापरतात. परंतु टेक्निकल कारणांमुळे काही कागदपत्रांच्या नावात बदल करावे लागतात. मुलींनो लग्नानंतर तुम्हाला तुमचे नाव बदलायचे आहे का? तर काही महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये तुम्हाला नाव देखील बदलावे लागेल. फेमिनाने त्याची तपासणी यादी तयार करुन हे कार्य सोपं केले आहे.
आजही लग्नानंतर मुलींना आडनाव बदलावे लागते. या आडनाव बदलण्याचा मुद्दा आजकाल इतका मोठा झाला आहे की त्याच्या व्यावहारिक बाबींकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. त्यात हे महत्वाचे आहे की, जर तुम्ही आडनाव बदलण्याचा विचार करत असाल किंवा त्याच आडनावाने आपल्या सासरच्या नावावर जोडू इच्छित असाल तर तुम्हाला तुमचे नाव बरेच अधिकृत कागदपत्रांमध्ये देखील बदलावे लागेल. त्यात चांगली गोष्ट अशी आहे की, यापैकी बहुतेक कागदपत्रांमध्ये एक काम करणे सोपे आहे. कारण यासाठी तुम्हाला फक्त एक कागदपत्र आवश्यक आहे आणि ते म्हणजे (मॅरेज सर्टिफिकीट) विवाह प्रमाणपत्र. विवाह प्रमाणपत्र बनवण्यापूर्वी, तुम्ही तुमचे आडनाव काय ठेवणार आहात, हे आधी ठरवले पाहिजे.
पॅनकार्ड
परमनंट अकाउंट नंबर (PAN) हा सर्वात महत्वाचा दस्तऐवज आहे. मॅरेज सर्टिफिकीट मिळताच पहिल्यांदा तुमचा पॅनकार्ड अपडेट करा. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी tin.tin.nsdl.com/pan/index.html या वेबसाइटवर लॉगिन करा. तुम्ही या वेबसाइटवर माहिती मिळवू शकता. नेहमी हे लक्षात ठेवा की तुमचा पॅन बदलणार नाही, परंतु तुमची नावे व नोंदी बदलतील. पॅनकार्ड मिळाल्यानंतर बँक आणि इतर वित्तीय संस्थांकडे जा आणि तिथेही आपले नाव बदलून घ्या.
बँक रेकॉर्ड्स
तुम्हाला सुरवातीला नाव आणि नवीन पत्ता बदलण्याबाबत बँकेला माहिती देणे आवश्यक आहे. जर तुम्ही काम करत असाल तर पहिल्यांदा तुम्ही ज्या बँकेत आपले पगार खाते (सॅलरी अकाउंट) आहेत तेथे जावा. ग्राहक सेवा कार्यकारी अधिकारी (कस्टमर केयर एग्ज़क्यूटिव) आपल्याला आवश्यक कागदपत्रांची माहिती देतील. लग्नाचे प्रमाणपत्र आणि आपल्या पतीच्या निवासस्थानाचा पुरावा हे तुम्हाला बँक रेकॉर्ड्समध्ये बदलून मिळू शकतात. जर तुम्ही पूर्ण कागदपत्रे घेऊन बँकेत गेलात तर बँकेत आल्यावर त्वरित तुमचे काम होऊन जाईल.
पासपोर्ट रेकॉर्ड्स
जर तुम्ही हनीमूनसाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर माहेरच्या म्हणजेच जुन्या नावानेच जा, कारण नाव बदलण्याच्या प्रक्रियेस वेळ लागतो. जर तुम्हाला आडनाव बदलायचे असल्यास तुमच्या शहरातील पासपोर्ट सेवा केंद्रावर पासपोर्ट नूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करा. तुम्हाला तुमचा जुना पासपोर्ट पतीच्या पासपोर्टच्या फ़ोटोकॉपीसह सादर करावा लागेल. जेव्हा तुम्हाला नवीन पासपोर्ट मिळेल तेव्हा जुन्या पासपोर्टसह तो टाका. अधिक माहितीसाठी www.passport.gov वर लॉगिन करा.
दुसरे रेकॉर्ड्स
जेव्हा तुम्ही आवश्यक कागदपत्रावर तुमचे नाव बदलत असाल तेव्हा इतर कागदपत्रांवर देखील लक्ष द्या. जर तुम्ही जुन्या नावावर गुंतवणूक केली असेल ज्यात विमा, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणूकी इ.साठी कागदपत्रे असतील. त्यात काही बदल करण्यासाठी संस्थांना आवेदन पाठवा. जर तुम्ही संपत्ति (मालमत्ता) खरेदी केली असेल तर स्थानिक (रजिस्टर) निबंधक कार्यालयाकडे अर्ज करावा लागेल. वाहन चालविण्याचा परवाना (ड्राइविंग लायसेंस), आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्रातही आपले नाव बदलणे उत्तम राहील.
संपादन : सुस्मिता वडतिले