Summer Fashion Tips: उन्हाळ्यात स्टायलिश दिसायचंय! मग रोजच्या रुटीनमध्ये करा हे 4 बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Summer Fashion Tips

Summer Fashion Tips: उन्हाळ्यात स्टायलिश दिसायचंय! मग रोजच्या रुटीनमध्ये करा हे 4 बदल

उन्हाळ्यात घाम येणे किंवा डियाड्रेशनमुळे चिडचिड सुरू होते. उष्णतेवर मात करण्यासाठी आपण आहारातील बदल किंवा इतर गोष्टींची मदत घेऊ लागतो. परंतु त्यापैकी बहुतेक लोक फॅशनच्या बाबतीत हलगर्जीपणा करतात.

उन्हाळ्यात, हलक्या रंगाचे आणि आरामदायक पोशाख घालण्यास प्राधान्य दिले जाते. त्यांमुळे शरीराचे तापमान नियंत्रीत राहण्यास मदत होते. जर तुम्ही हेव्ही कपडे परिधान केले तर तुम्हाला घाम येऊ लागतो किंवा तुम्हाला गरम देखील होते.

तसेच या सीझनमध्ये कपड्यांची निवड करताना कापडाचा प्रकार आणि रंग या दोन गोष्टीकडे अतिशय बारकाईने पाहणे गरजेचे असते. उन्हाळ्यात तुम्ही कोणते कपडे घालावेत असा प्रश्न तुम्हाला असेल तर आम्ही तुम्हाला येथे काही पर्याय सांगणार आहोत.

पांढरा किंवा हलका रंग

उन्हाळ्यात प्रत्येकाने आपल्या वॉर्डरोबमध्ये हलक्या रंगाच्या पोशाखांना जागा द्यावी. पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये उष्णता कमी असते आणि त्यातही आपण आकर्षक दिसतो. तुम्ही शॉर्ट ड्रेस, साडी, शर्ट किंवा पेन्सिल स्कर्ट वापरून पाहू शकता, फक्त त्यांचा रंग हलका किंवा पांढरा असावा.

फॅब्रिक आणि प्रिंट

उन्हाळ्यात आपल्याला जास्त घाम येतो, त्यामुळे कॉटन किंवा लिनेनचे कपडे घालावेत. तसेच, प्रिंटची विशेष काळजी घेतली पाहिजे. फ्लोरल प्रिंट उन्हाळ्यात घातली पाहिजे कारण ती उन्हाळा आणि पावसाळ्यात मस्त लुक देते.

मिक्स अँड मॅच

उन्हाळ्यात कपडे मॅच करण्याची पद्धतही वेगळी असावी. लेस टॉपवर तुम्ही डेनिम शॉर्ट्स घालू शकता. दुसरीकडे, रेशीम स्कर्ट कॉर्टेन टी-शर्टसह सुंदर दिसते. टेक्सचरमधील कॉन्ट्रास्ट एक अनोखा आणि लक्षवेधी लुक देतो.

आरामदायक आऊटफिट

उन्हाळ्यात टाईट कपडे घालणे टाळा. नेहमी सैल कपडे घाला. मुली प्लाझो, मॅक्सी ड्रेस, शॉर्ट ड्रेस किंवा अन्य पर्यायाने स्वतःला आरामदायक ठेवू शकतात.