
Mattress Cleaning : गादीवर पडलेले रक्ताचे आणि लघवीचे डाग कसे स्वच्छ कराल ?
मुंबई : अनेक वेळा आपल्या गादीवर रक्त किंवा लघवीचे डाग पडतात. मासिक पाळीच्या काळात अतिरक्तस्राव झाल्यास रक्ताचे डाग लागतात किंवा यूरिनची समस्या असल्यास त्याचेही डाग पडतात. (How to clean the blood and urine stains on the mattress)
लहान मुलेही काही वेळा अंथरूण ओले करतात. या डागांमधून दुर्गंधी येऊ लागते. प्रत्येक वेळी नवीन गादी आणणे शक्य नसते. मग अशा वेळी काय कराल ?
तुमची मॅट्रेस नवीन दिसण्यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. या टिप्स फॉलो केल्यास तुमच्या गादीवरील डाग सहज साफ होतील. हेही वाचा - हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार ?
बेकींग सोडा
बेकिंग सोडा आणि थंड पाणी मिसळून तुम्ही गादीवरील डाग सहज साफ करू शकता. हे द्रावण ज्या ठिकाणी डाग आहे त्या ठिकाणी लावा आणि काही वेळ तसंच राहू द्या.
काही वेळाने गादीवरील डाग सामान्य पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर गादी उन्हात ठेवा. नाहीतर ओली गादी खराब होईल.
डिटर्जंट
डिटर्जंटही वापरता येईल. डिटर्जंटमध्ये थंड पाणी घाला आणि ते मिश्रण डाग लागलेल्या भागावर लावा. काही वेळ तसेच ठेवा व नंतर धुआ. डाग लगेच स्वच्छ होईल.
लिंबू
लिंबू प्रत्येकाच्या घरात असतो. लिंबू काही मिनिटांत कोणताही डाग साफ करू शकतो. अशा परिस्थितीत जर तुमच्याही गादीवर डाग पडले असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
तुम्हाला फक्त गादीवर लिंबू चोळायचे आहे. लिंबू मऊ असल्यामुळे गादी अजिबात खराब होत नाही.