How To Impress Girl : 'या' पाच टिप्स ट्राय करुन गर्लफ्रेंडला चॅटिंगवरच करू शकता इंप्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

How To Impress Girl

How To Impress Girl : 'या' पाच टिप्स ट्राय करुन गर्लफ्रेंडला चॅटिंगवरच करू शकता इंप्रेस

How To Impress Girl : कोणत्याही मुलीसोबत पहिल्यांदा ऑनलाइन चॅट करणे तिच्यासोबत पहिल्यांदा डेटवर जाणे अशी भावना असते. मुलीला इंप्रेस करायची ही एक संधी असते. मुलीसोबत पहिल्यांदा चॅटवर बोलताना थोडं टेंशन आणि भीती वाटणे साहजिकच आहे.

तुम्ही चुकीची चॅटिंग केली तर तुमचा नंबर मुलगी ब्लॉकही करू शकते. त्यामुळे मुलीसोबत बोलताना प्रामाणिक, आत्मविश्वासू आणि नम्र राहणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही गर्लफ्रेंडला चॅटिंगवरच इंप्रेस करू शकता. (How To Impress Girl on chat)

  • चॅट दरम्यान मुलीला निसंकोचपणे बोलू द्या. त्याचं म्हणणं ऐकूण घ्या. तुम्ही फक्त तुमचीच बढाई मारत असाल तर तुमचं चुकीचं इम्प्रेशन पडू शकते. त्यामुळे समोरच्याचं बोलणं ऐकूण घेणे खूप जास्त गरजेचं आहे.

  • पहिल्यांदा चॅट करताना कधीच सिरीअस टॉपिकवर चर्चा टाळा. मजेशीर गोष्टींवर बोला ज्यामुळे मुलीला तुमच्यासोबत बोलण्याची पुन्हा इच्छा होणार.

  • चॅट करताना नेहमी धैर्य राखा कारण तुमच्यासाठी स्वत:च्या मनातील गोष्टी सांगणे, जितके महत्त्वाचे आहे तितकीच तिच्या मनातील गोष्टी ऐकूण घेणेही. त्यामुळे तिला पुर्णपणे मनमोकळेपणाने बोलण्याची संधी द्या. याशिवाय कोणतेही उत्तर देण्यासाठी तिला स्पेस आणि टाईम द्या.

  • चॅट करताना नेहमी खरे बोला. चॅटवर बोलताना कधीच खोटे बोलू नका. प्रामाणिकतेवर विश्वास ठेवा. जेव्हा तुमचं नातं समोर जातं तेव्हा खोटं मागे पडत जातं आणि खरेपणा अन् प्रामाणिकपणेमुळे नात दृढ होत जातं

  • मुलीसोबत पहिल्यांदा चॅटवर बोलताना नेहमी युनिक राहण्याचा प्रयत्न करा. युनिक गोष्टींवर चर्चा करा. ज्यामुळे तुमची चॅट उत्तम होणार आणि मुलगी इम्प्रेस होणार.