Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेला नॅचरली हायड्रेट कसं ठेवाल? ट्राय करा हे 'DIY Fruit Mask' l how to keep your skin hydrate this summer use diy fruit mask for beautiful skin | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Summer Skin Care

Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेला नॅचरली हायड्रेट कसं ठेवाल? ट्राय करा हे 'DIY Fruit Mask'

Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हामुळे स्किन बर्न, टॅनिंग अशा समस्या उद्भवतात. काहींना तर चेहऱ्यावर रॅशेसही येतात. तेव्हा यंदा उन्हाळ्यात तुमची त्वचा टवटवीत आणि कूल ठेवण्यासाठी हे नॅचरल फेस मास्क ट्राय करा. चला तर मग जाणून घेऊया या फ्रूट मास्कबद्दल.

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे, फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. शरीराप्रमाणेच त्वचेला सुद्धा हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. फळांच्या मदतीने तुम्ही त्वचा नॅचरली हायड्रेट ठेवू शकता. पब मेड सेंट्रलच्या संशोधनानुसार, फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर अँटी ऑक्सिडेंट असतात.

जे फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात. यासोबतच त्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजेही मोठ्या प्रमाणात असतात, जे त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक असतात. तुम्ही घरच्या घरी फळांचे मास्क बनवून स्किन हायड्रेट ठेवू शकता.

पपाया फ्रुट मास्क

पपई हे बीटा-कॅरोटीन फळाचा बेस्ट सोर्स आहे, त्यात अनेक प्रकारचे फायटोकेमिकल्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आढळतात. मध त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करेल. मास्क बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दोन चमचे पपईचा गर घ्या. तसेच आवश्यकतेनुसार एक चमचा मध आणि एलोवेरा जेल घाला. आता या फ्रूट मास्कने १० मिनिटे मसाज करा आणि १५ मिनिटे राहू द्या.

बनाना फ्रुटमास्क

बनानामध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे सर्व घटक त्वचेचे आरोग्य सुधारून बाह्य समस्यांपासून आराम देतात. केळ्याचा फ्रूट मास्क बनवण्यासाठी एका वाटीत केळी मॅश करा. आता त्यात ३ चमचे दही मिक्स करा. शेवटी अर्धा चमचा हळद मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.

स्ट्रॉबेरी फ्रुटमास्क

स्ट्रॉबेरीमध्ये असलेले घटक त्वचेतील अतिरिक्त तेल काढून पिंपल्सच्या समस्येपासून स्कीनला दूर ठेवतात. स्ट्रॉबेरीच्या वापरामुळे त्वचेची टॅनिंग दूर होऊन रंग सुधारण्यास मदत होते. स्ट्रॉबेरी फ्रूट मास्क बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये ६ ते ७ स्ट्रॉबेरी मॅश करा. यासोबत एक चमचा कोको पावडर आणि एक चमचा मध घाला. हा फ्रूट मास्क चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि २० मिनिटे राहू द्या. शेवटी चेहरा साध्या पाण्याने धुवा.

अॅप्पल अँड ऑरेंज फ्रुट मास्क

सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि व्हिटॅमिन सी सोबत त्वचेसाठी आवश्यक खनिजे आढळतात. जे त्वचेच्या पीएच लेव्हलचे संतुलन राखते. संत्र्याच्या रसाने त्वचेच्या समस्या वाढण्यापासून रोखता येतात. सफरचंद आणि संत्र्याचा मास्क बनवण्यासाठी एका बाउलमध्ये सफरचंद आणि संत्र्याचे दोन किंवा तीन तुकडे मॅश करा. आता त्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळून मसाज करा. १५ मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या, नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.

हे सगळे फेसमास्क (Skin Care) वापरण्याआधी कृपाय तुमच्या स्कीनला काही गोष्टींची अॅलर्जी असल्यास तुमच्या स्कीन स्पेशालिस्टला आधी विचारून या फेस मास्कचा अवलंब करा.