
Adhaar-PAN Link : फक्त एका एसएमएसद्वारे लिंक करा आधार कार्ड आणि पॅन कार्ड
मुंबई : आधार कार्ड, पॅन कार्ड आजकाल अनेक महत्त्वाच्या दस्तावेजांपैकी एक झाले आहेत. त्यामुळे सरकारने हे दोन्ही दस्तावेज एकमेकांशी जोडणे अनिवार्य केले आहे. सर्व सरकारी कामांमध्ये यांचा वापर केला जातो.
सरकारने ही दोन्ही कागदपत्रे लिंक करण्यासाठी ३० जून २०२३ पर्यंत मुदत दिली असून त्यासाठी १ हजार रुपये दंड भरावा लागेल. (how to link adhaar card and PAN card by SMS )
प्राप्तिकर विभागाने आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी जोडण्यासाठी ३१ मार्च २०२३ ही तारीख दिली होती. ती वाढवून ३० जून २०२३ करण्यात आली. विहीत मुदतीत तुम्ही हे काम केले नाही तर तुमचे पॅन कार्ड इनव्हॅलिड मानले जाईल आणि त्यामुळे तुम्हाला गंभीर नुकसान सोसावे लागेल.
फक्त एका एसएमएसद्वारे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या जाऊ शकतात. जाणून घेऊ या हे कसे करता येईल.
जर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक नसेल तर फक्त एका एसएमएसद्वारे तुम्ही ते जोडू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ५६७६७८ किंवा ५६१६१वर एसएमएस पाठवावा लागेल.
एसएमएस पाठवण्यासाठी UIDPAN असं लिहून थोडी स्पेस सोडून पुढे १२ अंकी आधार क्रमांक आणि पुन्हा स्पेस देऊन १० अंकी पॅन क्रमांक लिहा. हा मेसेज ५६७६७८ किंवा ५६१६१वर पाठवा.
यासाठी तुमची जन्मदिनांक आधार आणि पॅन कार्डवर सारखीच असायला हवी.