बाहेर न जाता घरीच एन्जॉय करा Long Weekend? कसं ते जाणून घ्या | Long Weekend | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

long weekend

बाहेर न जाता घरीच एन्जॉय करा Long Weekend? कसं ते जाणून घ्या

सध्या लॉंग वीकएंड सुरू आहे. अनेकजण सुट्ट्यांचं प्लॅनिंग करतंय तर अनेकांना नेमकं जायचं कुठे असा प्रश्न पडला असावा. बाहेर प्रचंड गर्दी, वेळेवर तिकिट किंवा सगळं कसं मॅनेज होणार म्हणून कित्येकजण घरीच राहण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. घराबाहेर न पडताही तु्म्हाला लाँग वीकएंड किंवा सुट्टी एन्जॉय करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

हेही वाचा: weekend ला पुण्यात फिण्याचा विचार करताय? भेट द्या या ठिकाणांना

१. तुमच्या आवडीचं काम करा

तुमच्या आवडी निवडीला वेळ द्या. तुमचा छंद तपासा.जसे की चित्रकला, संगीत, डान्स, इत्यादी.

२. घर सजवा

घर सजवण्यात जी मजा असते ती कुठेही नसते.अनेकदा कामाच्या ओघात आपण घरांकडे दुर्लक्ष करतो. पण या लाँग वीकेंडला तुम्ही घर सजवू शकता.

३. फॅमेली गेट टूगेदर

कुटूंबासोबत तुम्ही वेळ घालवू शकता, यातून जो आनंद मिळेल तो नक्कीच जगावेगळा राहील.

हेही वाचा: 2021 मध्ये आहेत बरेच Long Weekend Vacation, आतापासून करा प्लॅन

४. घरीच स्पा किंवा मसाज करा

अनेकदा आपण पार्लरमध्ये जाऊन स्पा वैगरे करून घेतो.पण या हॉलीडेमध्ये तुम्ही घरीच स्पा किंवा मसाज करू शकता.

५. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मुव्ही पहा.

या लाँग वीकेंडला तुम्ही घरीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर मुव्ही पाहू शकता.यात गर्दी,किंवा तिकिटची अडचण नाही.अगदी आवडत्या व्यक्तींसोबत तुम्ही मुव्ही पाहू शकता

६. घरी मित्रांना बोलवून पार्टी करा

या लाँग हॉलीडेला तुम्ही घरच्या घरी मित्रांना बोलवून पार्टी करू शकता.एवढचं काय तर तुमचं आवडतं फुड तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मित्रांसोबत घरीच चिल करू शकता.

७. तुम्ही आवडते गेम्स खेळू शकता

तुम्हाला गेम्स खेळायला आवडत असेल तर तुम्ही ऑनलाईन गेम्स खेळू शकता याशिवाय मित्रांना घरी बोलवून त्यांच्यासोबतही तुम्ही आउटडोअर गेम्स खेळू शकता.

Web Title: How To Spend And Enjoy Long Weekend At Home Check Tips Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..