उन्हाळ्यात आता दुध खराब होण्याचं टेंशन मिटणार, फक्त याच भांड्यात ठेवा..

खरं तर उन्हाळ्यात दुध फार काळ टिकवणे, खुप मोठे आव्हान आहे.
how to store milk for long days in summer
how to store milk for long days in summersakal

दुध हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी दुध पिण्याची सवय अनेकांना असते. या व्यतिरिक्त सकाळचा चहा असो की सायंकाळचा चहा दुधाशिवाय अपुर्णच असतो. दुध हा प्रत्येकाच्या आहाराचा भाग बनलाय.

खरं तर उन्हाळ्यात दुध फार काळ टिकवणे, खुप मोठे आव्हान आहे. कारण उन्हाळ्यात उष्णतेमुळे दूध खुप लवकर खराब होते. पण आम्ही जर तुम्हाला सांगितले की तुम्ही आता दुध एक पेक्षा अधिक दिवस साठवून ठेऊ शकता. हो, हे खरंय. काही भांड्यात दुध साठवून ठेवल्याने दुध जास्त दिवस टिकतं. अनेक दिवस दुध खराब होण्यापासून खालील भांड्याचा वापर करा

how to store milk for long days in summer
प्रेमी युगुलांनो, 'हे' नियम समजून घ्या अन् कुठेही बिनधास्त फिरा!

काचेची बाटली वापरावी

अनेक दिवस दूध साठवायचे असेल तर काचेच्या बाटलीचा वापर करा. दुध काचेच्या बाटलीत ठेवायच्या आधी दूध चांगले उकळून घ्या. त्यानंतर थंड करून काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. बाटलीचे टोक झाकून ठेवा. विशेष म्हणजे काचेच्या भांड्यात दूध ठेवल्याने खराब तर होत नाही पण सोबत दुधाची चवही ताजी राहते.

how to store milk for long days in summer
पीएफ खातेदारांबाबत सरकारचा मोठा निर्णय; असा मिळणार लाभ

स्टीलच्या भांडीचा वापर करा

स्टीलची भांडी नेहमी उपयोगी असते. विशेषत: दुध साठवताना स्टील हे अत्यावश्यक आहे. स्टीलच्या भांड्यात ठेवलेल्या दुधाची चव टिकून राहते. दूध ठेवण्यापूर्वी दुध गरम करावे. सोबतच स्टीलचे भांडे स्वच्छ असणे गरजेचे आहे

how to store milk for long days in summer
उन्हाळ्यात थंड पाणी पिता का? आताच थांबवा, नाहीतर..

प्लास्टिक कॅनचा वापरा

दूध साठवण्यासाठी प्लास्टिकचा कॅनचा वापर उत्तम आहे. प्लास्टिकच्या कॅनमध्ये दूध साठवण्यासाठी सर्वप्रथम दूध चांगले उकळून घ्यावे. थंड केल्यानंतर दूध प्लास्टिकच्या डब्यात घालून ठेवा. यात साठवलेले दूध जवळपास २-३ दिवस खराब होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com