
Hug Day 2023 : ‘जादू की झप्पी’ देण्याचा भन्नाट व्यवयास; लोक तासाला कमावतात हजारो रूपये!
सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन विकची हवा आहे. आज हग डे आहे. एकमेकांना मिठी मारून प्रेम व्यक्त करण्याचा आजचा दिवस. काहीवेळा लोक इतके निराश आणि डिप्रेस असतात. कि लोकांना मिठी मारून त्यांना भावनांना मोकळं होण्यासाठी त्यांना एका मिठीची गरज असते.तूमची हिच गरज ओळखून जगातील काही अवलिया लोकांनी यालाच आपला व्यवसाय बनवला आहे.
भारतात कोणाला मिठी मारायला कोणत्या खास दिवसाची गरज नसते. जून्या काळातील म्हाताऱ्या आजी आजही भेट झाली कि आधी प्रेमाने जवळ घेतात. अलिंगन देतात आणि मग पाहुणचार करतात. जगातील या अनोख्या लोकांना बेड थेरपिस्ट कडलर म्हणतात. आज हग डेच्या निमित्ताने असा मिठी मारण्याचा व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल जाणून घेऊयात.
रोबिन मेरी
असा भन्नाट व्यवसाय करणाऱ्या या महिलेचे नाव रोबिन मेरी असे आहे. ती अमेरिकेत राहते. या वेगळ्या मार्गाने दर तासाला हजारो रूपयांची कमाई करत आहे. यासाठी तिला कुठल्याही प्रकराची गुंतवणूक अथवा परिश्रम करत नाही. असे या महिलेचे नाव आहे. ती लोकांना मिठी मारते आणि याबाबत त्यांच्याकडून शुल्काच्या रुपात मोठी रक्कम घेते.
कंसास येथील रहिवासी रॉबिन मेरी लोकांना फक्त मिठी मारून प्रेमाने त्यांना झोपी घालते. असे करण्यासाठी ती 80 डॉलर (5,635) प्रति तास शुल्क आकारते. मेरी एक प्रोफेशनल कडलर आहे. ती आपल्या या सुविधेद्वारे लोकांना रिलॅक्स फील करवते.

क्रिस्टीना लिंक
पूर्व लंडनच्या स्ट्रॅटफोर्ड येथे राहणारी 30 वर्षीय क्रिस्टीना लिंक दुःखी, उदास किंवा एकाकी असलेल्या अनोळखी लोकांना सांत्वन देते. क्रिस्टिना तिच्या एका सत्रातून 17 हजार रुपये कमावते. ती तिच्या ग्राहकांना फक्त भावनिक आधार देते. लोक अनेकदा तिच्या या कार्याबद्दल चुकीचा समज करून घेतात. परंतु असे काहीही नाही. ती हे सर्व समाधानाच्या भावनेने करते.

ट्रेव्हर हुटोन
ट्रेव्हर हुटोन हा ३० वर्षीय माणूसही असाच भारी व्यवसाय करतो. मुळचा कॅनडाचा असला, तरी आता टो ब्रिस्टल, इंग्लंड मध्ये स्थायीक झाला असून टो ‘कडलिंग’ चा व्यवसाय करतो. एखाद्याला मिठी मारण्यासाठी किंवा मिठीत घेवून थोपटण्यासाठी टो तासाला ७००० रुपये चार्जेस म्हणून आकारतो.