Hug Day : मित्राला अन् पार्टनरला मारलेल्या मिठीत काय फरक असतो? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hug Day

Hug Day : मित्राला अन् पार्टनरला मारलेल्या मिठीत काय फरक असतो?

Hug Day : देशभरात वेलेंटाईन वीक जोमात सुरू आहे. प्रेमी लोक आनंदाने आणि तितक्याच उत्साहाने हा दिवस साजरा करताहेत. आज हग डे आहे. मिठी दिवस. ज्याला आपण अलिंगन, मिठी किंवा जादू की झप्पी म्हणूनही संबोधतो.

खरं पहायला गेलं तर प्रत्येक मिठीचे किंवा अलिंगनाचे वेगवेगळे महत्त्व असते आणि हे महत्त्व आपण कोणाला आणि कोणत्या परिस्थितीत समोरच्याला मिठी मारतो, यावरही अवलंबून असते. पण तुम्हाला माहिती आहे का मित्राला अन् पार्टनरला मारलेल्या मिठीत काय फरक असतो? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. (Hug Day : what is the difference between in friend hug and partner hug read story)

मित्राला मारलेली मिठी

मित्र हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही जीवाचे मित्र असतात. हे मित्र जेव्हाही भेटतात तेव्हा त्यांना घट्ट मिठी मारावीसी वाटते. मित्र कधी आपल्या सुखात तर कधी दु:खात सहभागी होतात. आयुष्याच्या कटू प्रसंगी धीर देतात आणि आनंदाच्या प्रसंगी आपल्या इतकेच ते आनंदी असतात.

या भावना व्यक्त करताना मित्राला मारलेली मिठी ही खूप खास असते. कधी कधी मित्राला मारलेली एक मिठी जादू की झप्पी वाटते पण ही मिठी एका मित्रत्वाच्या भावनेतून मारलेली असते.

पार्टनरला मारलेली मिठी

पार्टनर म्हटलं की प्रेम आलं. पार्टनरला मारलेली प्रत्येक मिठी हे प्रेम करण्याची एक भावना असते. पार्टनरही एक उत्तम मित्र असतात. त्यामुळे त्यांच्या मिठीतही कधी कधी तुम्हाला मित्रत्वाची भावना येऊ शकते.

पार्टनरच्या मिठीत तुम्हाला हवीहवीशी वाटते कारण त्यांना दिलेलं अलिंगन हे केवळ मानसिक थकवाच दूर करत नाही तर तुमचा शारीरीक थकवाही दूर करतो. त्यामुळे पार्टनरची मिठी ही खूप खास असते.