Husband wife : 'या' पाच कारणांमुळे नवरा घरच्या कामात मदत करत नाही | Relationship Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Husband wife

Husband wife : 'या' पाच कारणांमुळे नवरा घरकामात मदत करत नाही

Husband wife : अनेक भारतीय पुरुष घरच्या कामात मदत करत नाही. एवढंच काय तर आज जेव्हा पत्नी सुद्धा नवऱ्याप्रमाणे नोकरी करत असली तर तिला घरचं सर्व काम एकटंच करावं लागतं.

भारतीय कुटूंब व्यवस्थेत अनेकदा महिलांना लग्नानंतर नोकरी करण्याची परवानगी ही तेव्हाच दिली जाते जेव्हा त्या घरची जबाबदारीही घेणार पण पुरुषांकडून अशी कोणतीच अपेक्षा ठेवली जात नाही. (why husband does not help in household work )

नवरा जर घरकामात मदत करत असेल तर घरच्या स्त्रियांना कामे ओझं वाटत नाही. मात्र हे खूप दुर्मिळ दिसून येतं आणि याच कारणांमुळे अनेकदा घटस्फोट झाल्याचंही दिसून आलंय पण तुम्हाला माहिती आहे का नवरा घरकामात का मदत करत नाही. आज आम्ही यामागील काही ठराविक कारणे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

बाहेरच्या कामात व्यस्त असणे

जर तुमचा नवरा बाहेरच्या कामात व्यस्त असेल तर कदाचित तुम्हाला तो घरकामात मदत करु शकत नसेल. असंही होऊ शकतं की बाहेरील जबाबदारी पार पडताना त्यांना मानसिक आणि शारीरिक ताण असेल तर त्यामुळेही ते घरकामात लक्ष देऊ शकत नाही.

जबाबदाऱ्या आवडत नाही

जर तुमचा पती घरकामात मदत करत नाही याचा एक अर्थ त्यांना जबाबदाऱ्या आवडत नाही, असाही होतो. असे लोकांना त्यांच्या आजूबाजूला काय होतं आहे, याचं काहीही भान नसतं. एवढंच काय तर घरची स्त्री आजारी असेल तरीसुद्धा त्यांना काही फरक पडत नाही. ते आपल्याच विश्वात रमलेले असतात.

मदत करण्याची संधी मिळत नाही

जर घरची स्त्री स्वत:च सर्व काम करत असेल तर त्यांनी ही आशा ठेवू नये की तुमचा पती जबरदस्तीने तुम्हाला मदत करणार. तुमच्या नवऱ्याला असं वाटू शकते की तुम्हाला एकटं काम करायला आवडतं किंवा तुम्ही एकटं सर्व काम करू शकता. त्यांना मदत करायची संधी मिळाली नाही तर ते तुम्हाला मदत करू शकणार नाही.

"पुरुष घरकाम करत नाही."

आपल्या भारतीय समाजात पुरुष घरकाम करत नाही. ही खूप काळापासून चाललेली रीत आहे. त्याप्रमाणे काही काम महिलांना दिले आहे जसे की भांडी घासणे, कपडे धुणे, घर स्वच्छ ठेवणे, जेवण तयार करणे, काही कामे फक्त महिलांना दिले आहे. जर तुमचा पतीही हाच विचार करत असेल तर तो तुम्हाला कधीच घरकामात मदत करणार नाही.

मदत केल्यानंतर टोमणे ऐकावे लागतात

तुमच्या नवऱ्याला तुमची मदत केल्यानंतर लोकांचे टोमणे ऐकावे लागत असेल त्यामुळे कदाचित ते तुम्हाला ते मदत करू शकत नसावे. त्यामुळे अनेकदा पुरुष मित्रपरिवार, आईवडिल किंवा नातेवाईकासमोर घरकामात मदत करत नाही.