डोळ्यांची निगा राखायची असेल तर माहित करून घ्या घरगुती उपाय

If you want take care of your eyes here are 4 home remedies
If you want take care of your eyes here are 4 home remedies

औरंगाबाद: सौंदर्यात उजाळून दिसण्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचे डोळे असतात. डोळ्यांची काळजीही व्यवस्थित घेतली पाहिजे. जर तुम्ही तुमच्या डोळ्याचा मेकअप ठीक केला तर तुमच्या सौंदर्यात मोठी भर पडते. डोळ्यांच्या मेकअपबद्दल आज काही बाबींवर चर्चा करूया.

डोळ्यांचा नियमित व्यायाम करावा-
जर डोळ्यांचा व्यायाम नियमित केला तर डोळ्यांची चांगली निगा राखली जाते.तसेच डोळ्यांबद्दल बऱ्याच अडचणी दूर होतात.

गॉगल-
100 टक्के युव्ही प्रोटेक्शनचे गॉगल वापरले पाहिजेत. हे गॉगल अल्ट्रा - व्हायलेट किरणांपासून पूर्णपणे काळजी घेऊन तुमच्या डोळ्यांचा चांगलं संरक्षण देते.

पापण्या उघडझाप करा-
डोळ्यांना ताजं वाटण्यासाठी डोळे उघडझाप करावे. यामुळे डोळ्यांना चांगली सुरक्षा प्राप्त होते. सुरक्षात्मक द्रव बाहेर जाऊन डोळे कोरडे होणार नाहीत.

टीव्ही आणि कम्प्यूटरपासून दूर राहिलं पाहिजे-
जास्त वेळ टिव्ही पाहणे धोकादायक ठरू शकते. जास्त वेळ कंम्पूटरवर काम करणेही धोक्याचं आहे. त्यामुळे काळजी घेऊन काम केलं पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com