
Styling Tips: उन्हाळ्यात पांढऱ्या कुर्त्यांमध्ये कूल आणि स्टायलिश दिसायचंय, मग फॉलो करा या फॅशनेबल टिप्स
पांढरा रंग साधेपणाचे प्रतीक असला तरी त्यासोबतच तो रॉयल लूकही देतो. उन्हाळ्यात लोक पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य देतात. यामुळे तुमचे शरीर थंड राहते आणि तुम्हाला गरम होऊ देत नाही. उन्हाळ्यात या रंगाचे कपडे घालणे महिलांना प्रचंड आवडते. पांढऱ्या रंगाच्या कुर्त्याला तुम्ही अनेक प्रकारे स्टाइल करू शकता.
पांढरा कुर्ता स्टाईल करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत. तुम्हाला एकाच प्रकारे पांढऱ्या कुर्त्याला स्टाइल करण्याचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही या स्टायलिंग टिप्स फॉलो करू शकता. तुम्ही कोणत्या स्टाइलिंग टिप्स फॉलो करू शकता ते आम्ही तुम्हला सांगतो.
जीन्स आणि व्हाईट कुर्ता
जीन्ससोबत तुम्ही व्हाईट कुर्ता पेअर करू शकता. हे कॉम्बिनेशन कधीही ट्रेंडच्या बाहेर जात नाही. डेट आउटसाठी कुर्ता स्टाइल करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. त्यासोबत तुम्ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घालू शकता.
कुर्ता ड्रेस
लॉंग कुर्ता हा तुम्ही ड्रेस म्हणून घालू शकता. त्यासोबत बेल्ट आणि हाय हिल्स देखील घालू शकता. स्टेटमेंट अॅक्सेसरीज तुमचा लुक पूर्ण करतील. तुम्ही त्याच्यासोबत जॅकेट किंवा ब्लेझर देखील पेअर करू शकता.
कलरफुल अॅक्सेसरीजसह
तुम्ही रंगीबेरंगी अॅक्सेसरीजसोबत पांढरा कुर्ता पेअर करू शकता. हा पांढरा कुर्ता तुम्ही कलरफुल पर्स, ब्राईट शूज आणि स्कार्फसह स्टाइल करू शकता.
बोहो लूक
आजकाल बोहो लूक ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही प्रिंटेड स्कर्टसोबत पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालू शकता. त्यासोबत तुम्ही कलरफुल बांगड्या किंवा सँडल घालू शकता. फेस्टिवल किवा आउटडोर कार्यक्रमांसाठी ही एक उत्तम स्टाईल असू शकते.
लेयर स्टाईल
पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यासाठी तुम्ही लेयर स्टाइलही ट्राय करू शकता. यासाठी तुम्ही पांढऱ्या कुर्त्याला मल्टिकलर श्रग आणि बिंदीसोबत पेअर करू शकता. मित्रांसोबत ब्रंच किंवा डे आउटिंगसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.