उन्हाळ्यात घामामुळे केसांमधून दुर्गंधी येतीय? 'या' घरगुती उपायांनी दूर करा

उन्हाळ्यात घाम येणे ही सामान्य गोष्ट
Smelly Hair In Summer
Smelly Hair In Summereakal
Summary

उन्हाळ्यात घाम येणे ही सामान्य गोष्ट

उन्हाळ्यात (Summer Season) आपण सगळेच घामाच्या समस्येने त्रस्त होतो. शारीरिक परिश्रम, जनुकीय संप्रेरक असंतुलन आणि वातावरणातील वाढलेले तापमान ही घाम येण्याची प्रमुख कारणे आहेत. घामामुळे शरीरात बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection) देखील होऊ शकतो. उन्हाळ्यात घाम येणे ही सामान्य गोष्ट असली तरी घामामुळे शरीरात जमा झालेली चरबी कमी होते. तसेच अनेक आजारांपासून सुटका होते. जरी घाम येणे पूर्णपणे गंधहीन असले तरी, ते त्वचेमध्ये असलेल्या बॅक्टेरियांसह एकत्र येऊन दुर्गंधी निर्माण करते. उन्हाळ्यात त्वचेतूनच नव्हे तर कधी केसांमधूनही घामाचा वास (Odor of Sweat) येतो. चला तर मग काही उपाय जाणून घेऊयात, ज्यामुळे तुमच्या केसांमधून घामाचा वास येणं बंद होईल.

Smelly Hair In Summer
जास्त घाम येणे रोगांचे लक्षण असू शकते, कारणे आणि उपचार जाणून घ्या

- उन्हाळ्यात केसांमधून येणाऱ्या घामाच्या वासापासून सुटका मिळवण्यासाठी गुलाबपाणी आणि लिंबाचा रस एक कप पाण्यात मिसळून केस धुवावे. असं केल्याने केसांमधील घामाचा वास निघून जाईल आणि यामुळे तुम्ही फ्रेश राहाल.

- उन्हाळ्यात केसांमधून घामाचा वास घालवण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता. जर तुम्हाला कोरफड जेल मिळत नसेल तर तुम्ही कोरफडच्या पानांपासून कोरफड जेलही बनवू शकता. आठवड्यातून दोनदा या जेलने केस धुतल्याने केस चमकदार आणि सुगंधी होतात आणि केसांमधून येणाऱ्या घामाचा वासही दूर होतो.

- उन्हाळ्यात घाम आल्यामुळे केसांना दुर्गंधी तसेच चिकटपणा येऊ लागतो. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता. आंघोळ करताना पाण्यात गुलाबपाण्याची दोन चमचे घालून त्याबरोबर केस धुवावेत. असे केल्याने केसांचा चिकटपणा दूर होईल आणि घामाच्या वासापासून मुक्ती मिळेल.

Smelly Hair In Summer
घाबरल्याने का येताे जास्त घाम? घाम थांबविण्यासाठी जाणून घ्या साेप्या टिप्स

- टोमॅटोचा उपयोग केसांमधून घामाचा वास काढून टाकण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. टोमॅटोचा लगदा काढून मिक्सरमध्ये वाटून घेऊन केसांच्या मुळांमध्ये लावल्याने केसांमधून येणाऱ्या घामाच्या वासापासून सुटका होते आणि त्यामुळे केस चमकदारही होतात.

- जर तुम्हाला घाम येण्याचा त्रास जास्त असेल आणि केसांनाही घामाचा वास येत असेल तर तुम्ही मुलतानी माती दही किंवा ताकात मिसळून केसांमध्ये लावू शकता. ते लावल्यानंतर ७ ते १० मिनिटे केसांमध्ये ठेवा. आठवड्यातून एकदा हा उपाय करण्याचा सल्ला दिला जातो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com