सुंदर हिरवीगार झाडं घरात हवी असतील तर अशी करा 'इनडोअर गार्डनिंग'!

Sakal - 2021-03-02T155746.731.jpg
Sakal - 2021-03-02T155746.731.jpg

नाशिक : घर कार्यालय किंवा रेस्टॉरंट असो या सर्वांची शोभा वाढते ती बागेमुळे घरात आणि घराबाहेरील वातावरणाला अनुकूल आणि सुसंगत अशी बाग असायला काही हरकत नाही. पण आपल्या इथे जागेची खूप मोठी समस्या आहे. सुंदर हिरवीगार पालवी फुटलेली बाग ही मनाला वेगळाच आनंद देते. सुरुवातीच्या काळात बाग मोकळ्या मैदानावरील जागेत होती पण जागेची समस्या पाहता हल्ली इनडोअर गार्डन अर्थात घरातील बाग ही संकल्पना अधिक झपाट्यानं लोकप्रिय होत आहे.

इनडोअर बागेने प्रसन्न वातावरण

टवटवीत झाडे आणि फुले वातावरणात एक सकारात्मकता निर्माण करतात. त्यामुळे मन आणि स्वास्थ्य प्रसन्न राहते. इनडोअर बागकामात ताजी फुलं तसेच अन्य वनस्पतींची होत असलेली वाढ घरात एक सुगंध निर्माण करते. अशीच काही झाडं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी तुम्ही घरच्या बागेत ठेवू शकता.

बाल्कनीतली बाग 

आपल्या घराला बाल्कनी किंवा व्हरांडा असेल तर आपण त्याचा उपयोग कुंडय़ांतून सुंदर फुलझाडं तसंच दैनंदिन वापरासाठी (स्वयंपाकघरासाठी) लागणारी किंवा औषधी वनस्पती ठेवू शकतो. घर सजविण्यासाठी आपण कुंडय़ातील झाडं ठेवतो. छोटय़ाशा जागेला सुंदर रूप देण्यासाठी अर्थातच झाडांची निवड अतिशय महत्त्वाची आहे. कारण आपल्याकडे जागा थोडी आहे. त्यामुळे मोजक्याच वनस्पती आपण ठेवू शकतो. शिवाय व्हरांडय़ाचा मधला भाग सहसा मोकळा ठेवतो. कारण तिथेच उभं राहून आपण बाहेरचं जग बघतो. त्यामुळे व्हरांडय़ाच्या आकारमानानुसार एक किंवा दोन कोपरे कुंडय़ा ठेवण्यासाठी उपयोगात येतात. आपल्याकडे निवडी बाबतीत आता दोन पर्याय आहेत. एक म्हणजे सुंदर पानांची वा फुलांची फुलझाडं व दुसरा पर्याय स्वयंपाकात लागणारी वा औषधी वनस्पतींची लागवड. व्हरांडय़ातल्या फुलझाडांची निवड करताना काही गोष्टी ध्यानात ठेवाव्यात.

काही गोष्टी ध्यानात ठेवा
-ही फुलझाडं एक ते दीड मीटर उंचीपर्यंतच वाढणारी असावीत. अवाढव्य पसरणारी नसावीत.
-एक महत्त्वाचा भाग म्हणजे व्हरांडय़ाची दिशा. वेगवेगळ्या वनस्पतींची सूर्यप्रकाशाची गरज ही वेगवेगळी असते. 
-त्याप्रमाणे व्हरांडा दक्षिणाभिमुख किंवा पश्चिमाभिमुख असेल तर अशा ठिकाणी सूर्यप्रकाश तीव्र असतो. 
-त्यामुळे अशा जागी पूर्ण प्रकाशात वाढणाऱ्या वनस्पतीच ठेवाव्यात.
-फुलझाडं वर्षांतून जास्तीत जास्त काळ बहरणारी असतात.
-फुलझाडं सुगंधी असल्यास सोने पे सुहागा.

अॅन्थुरियम
अॅन्थुरियम या वनस्पतीच्या फुलांचा हृदयाकृती आकार, लालभडक रंग आणि मध्यावर पिवळसर कोवळा देढ आकर्षक दिसतो. ही फुले जाडावर २० ते २२ दिवस छान टवटवीत राहतात. फुलं झाडावरून काढून फुलदाणीत ठेवली तरी १० ते १२ दिवस चांगली राहतातयाची फुलं वर्षभर फुलतात. या झाडांच्या मुळांजवळ हवा खेळती ठेवण्यासाठी ही मातीच्या मिश्रणात न लावता नारळाच्या सोढणाचे तुकडे, विटांचे तुकडे आणि लोणारी कोळशाचे तुकडे समप्रमाणात घेऊन त्यात याचे रोप लावावे. बदामी आकाराच्या पानांची वेल असणारी ही वनस्पती भरघोस वाढते. सावलीत या वनस्पतीची वाढ होते. पण सूर्यप्रकाशात ती अधिक टवटवीत होते. हँगिंग बास्केटमध्ये जर ही वनस्पती लावली तर अधिक शोभून दिसेल.

ड्रेसेना प्लांट
लांब निमुळती पाने, त्यावर पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या रेषा आणि छान उंच वाढणारी ड्रेसेन प्लांट. पाण्याच्या प्रमाणाचे योग्य संतुलन साधून, या वनस्पतीच्या कुंडीतील माती साधारण ओलसर राहिल याची काळजी घ्यावी.

अॅल्युमिनियम प्लांट
हिरव्यागर्द आखूड पानांवर पिवळट पांढऱ्या पट्यांनी सजलेली ही वनस्पती छान उंच वाढते. मात्र, या वनस्पतीला जास्त वाढू देऊ नये. सतत छाटत रहावे.

बिलबर्जीया
हे झाड अननसाच्या कुळातील आहे. यास एकदा फुल आले की मग ते झाड मरते. पण मरण्याआधी त्यास ४-५ पिले फुटतात आणि कालांतरानं त्यांनाही फुले येतात. स्प्रेच्या मदतीनं या झाडांना पाणी द्यावं. पानाच्या खोडावरील भागात काही विशिष्ट प्रकारच्या पेशी हे पाणी शोषून घेतात आणि त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com