esakal | International Literacy Day 2021 : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस का साजरा करतात? काय आहे महत्त्व?
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस का साजरा करतात? काय आहे महत्त्व?

International Literacy Day 2021: माहामारीमुळे आता ऑनलाईनपध्दतीने वर्ग सुरु आहेत. त्यामुळे आपल्याकडील इंटरनेट कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाशी जोडण्याची क्षमता यांची सद्यस्थिती काय आहे हे उघड झाले आहे.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस का साजरा करतात? काय आहे महत्त्व?

sakal_logo
By
शरयू काकडे

International Literacy Day 2021: आज जगभरात आंतराराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जात आहे. 1965 रोजी सप्टेंबरमध्ये इरानची राजधानी तेहरानमध्ये जवळपास सर्व देशांचे शिक्षामंत्री एकत्र झाले होते. या संमेलनादरम्यान, साक्षरतेचे महत्त्वबाबत चर्चा झाली होती. ज्यानंतर 1966मध्ये संयुक्त राष्ट्र वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को) द्वारा 8 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून घोषित करण्यात आला.

जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा जग सामना करत आहे. ज्यामुळे शिक्षण आणि साक्षरतेसाठी खूप अडचणी येत आहे. लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद झाल्या तसेच आता शिक्षण घेण्याच्या पध्दतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. हे सर्व पाहाता युनेस्कोच्या मानव-केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता: डिजिटल विभाजन कमी करण्याच्या (Literacy for a Human-Centered Recovery: Narrowing the Digital Divide) थीमवर आंतराराष्ट्रीय साक्षरता दिवस 2021 साजरा करण्याची घोषणा केली आहे

यूनेस्कोने ट्विट केले आहे की, ''डिजीटल स्किल्स आता जीवनाआवश्यक माहिती पोहचविण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन बनले आहे. पण जगातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येकडे कॉप्यूटरवर आधारित उपक्रमासाठी पायाभूत सुविधा नाही. आम्हाला सर्वांसाठी साक्षरता आणि डिजीटल कौशल्याचा प्रसारासाठी प्रयत्न वाढले पाहिजेत.''

आंतराराष्ट्रीय साक्षरता दिवस (ILD 2021) साजरा करणे का गरजेचे आहे?

यूनेस्कोच्या माहितीनुसार, कोरोना माहामारीच्या सुरवातीच्या टप्प्यात शाळा बंद झाल्यामुळे जगातील 1.09 बिलियन विद्यार्थ्यांपैकी 62.3 विद्यार्थ्यांना फटका बसला. माहामारीमुळे आता ऑनलाईनपध्दतीने वर्ग सुरु आहेत. त्यामुळे आपल्याकडील इंटरनेट कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाशी जोडण्याची क्षमता यांची सद्यस्थिती काय आहे हे उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (ILD 2021) हा 1966 पासून 8 सप्टेंबरला साजरा केला जातो पण आज 773 मिलियन युवक आणि प्रौढ निरक्षर आहेत.

loading image
go to top