Intresting Fact : डोकं कसं तडतड तडतड! लोकांना दारु प्यावी असे का वाटते? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Intresting Fact

Intresting Fact : डोकं कसं तडतड तडतड! लोकांना दारु प्यावी असे का वाटते?

लोकं पैसा, सोनं, प्रेम यासाठी जितके वेडे असतात त्याहून अधिक जास्त दारूसाठी असतात. म्हणून तर कोरोना काळात घालवल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा दारूची दुकाने सुरू झाली. तेव्हा लोकांनी अक्षरश: तुंबाड गर्दी करत दारू खरेदी केली.

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात लोकांनी पोलीसांचा मार खात दारू खरेदी केली. तर, काहींनी ती चोरून आणली. पण ती पिण्याची थांबवणे शक्य झालं नाही. असं या दारूत काय असतं की ज्याने लोकांना तिला स्वत: पासून दूर करणं शक्य नसतं. त्यातही दारू पिण्याची कारणं काय आहेत जाणून घेऊयात.  

जर तुम्ही पार्टीला गेलात आणि दारुला नाही म्हणालात तर कुणीतरी एखादी व्यक्ती तिथं असते जी चटकन म्हणते "अरे, एका ड्रिंकनं काही होणार नाही. नाहीतर वाईन घे. वाईन हृदयासाठी चांगली असते. घे थोडी, असंच रोज एक घोट घेत दारूची सवय लागते. पण , त्याची कारणंही भन्नाट आहेत.

दारूचा कडू घोट पोटात गेला की मेंदूत झिणझिण्या यायला लागतात, हलकं हलकं वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतं. बायकोची कटकट, मुलांची भुणभूण, ऑफिसचं प्रेशर, पैशाचं टेन्शन, सगळं सगळं दूर पळतं. मस्तपैकी हवेत तरंगल्यासारखं वाटतं, म्हणून सतत दारूला जवळ करणारे लोकही आपल्या आसपास आहेत.

टेंन्शन

माझी म्हैस दूध देत नाहीय, माझी मुलं अभ्यास करत नाहीत. माझी पत्नी सतत पैसै मागते किरकीर करते म्हणून मी दारू पितो. हि लोकांची दारू पिण्याची कारणं आहेत. कारण, लोकांनी दारूच्या व्यसनाला स्वत:च्या टेंशनसोबत जोडले आहे. म्हणूनच दारू पिण्याचे महत्त्वाचे कारण असे आहे की, लोकांना टेन्शन येत.

लिटल लिटर घेऊन थांबणं शक्य नसतं

लिटल लिटर घेऊन थांबणं शक्य नसतं

झोप येत नाही

अनेक लोकांना नीट झोप लागत नाही, ते झोप येण्यासाठी दारू पितात. डोक्यात सुरू असलेले विचारटक्र थांबावे  आणि शांत झोप लागावी यासाठी लोक एकावर एक पेग रीचवत असतात.

एन्जॉय

आम्हाला आयुष्य एन्जॉय करायचंय, म्हणून आम्ही दारू पितो, अशीही सध्याच्या तरूण मंडंळींची दारू पिण्याची कारण आहेत.

शारीरीक थकवा घालवण्यासाठी

एखादा कष्टाचे काम करणारा मजूर रोज दारू पिऊन घरी जातो, जेवतो आणि झोपतो. दिवसभर केलेल्या कामामूळे संपूर्ण शरीर दुखत असतं. त्यामूळे दारू पोटात गेली की पेन किलर आणि झोपेच्या गोळीसारखे काम करते आणि त्या मजूराला शांत झोप येते.

स्टेटस जपण्यासाठी

तो इतका श्रीमंत आहे पण दारू पित नाही, म्हणून लोक खिल्ली उडवतात. त्यामूळे मी दारू प्यायला सुरूवात केली, अशीही अनेक लोकांची कारणे आहेत.