esakal | वजन कमी करण्याची जपानी टॉवेल टेक्निक, 10 दिवसांत होतील अ‍ॅब्‍स; वैज्ञानिकाचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

वजन कमी करण्याची जपानी टॉवेल टेक्निक, 10 दिवसांत होतील अ‍ॅब्‍स?

वजन कमी करण्याची जपानी टॉवेल टेक्निक, 10 दिवसांत होतील अ‍ॅब्‍स?

sakal_logo
By
शरयू काकडे

सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आज काल कित्येक जण अॅब्ज तयार करतात. अॅब्स बनविण्यासाठी लोक जीम किंवा फिटनेस सेंटमध्ये तासंतास घाम गाळतात. एब्डोमन एरियाला फ्लॅट करण्याच्या नादात लोक क्रंचस, सिटअप्स आणि फ्लेक्स सारखे अवघड एक्सरसाईज करतात पण सर्वांना माहित आहे पोटावरची चरबी कमी करणे इतकी सोपी गोष्ट नाही.

हेही वाचा: नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; देवीच्या मूर्ती महागल्या

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एक व्हिडिओमध्ये दावा केला आहे की, 5 मिनीट जपानी टॉवेल एक्सरसाईज केल्यास करण्यासाठी फक्त 10 दिवसांमध्ये आकर्षत अॅब्स बनवू शकता. हा व्हिडिओ @tiabagha नावाच्या अकांऊटवर पोस्ट करण्यात आला असून व्हिडिओ 28 लाख लोकांनी लाईक कमेंट केले आहे.

जॅपनीज रिफ्लेक्सॉलॉजी अॅन्ड मसाज् स्पेशालिस्ट डॉक्टर तोशिकी फुकुत्सजी यांनी बॉडीला शेपमध्ये आणण्यासाठी जवळपास दहा वर्षांपूर्वी जपानी टॉवेल टेक्निक विकसित केली. त्याचा दावा होता की ही टेक्निक पोटाची चरबी कमी होते आणि बॉडीचे पोश्चर व्यवस्थित करण्यासाठी आणि कंबरदुखी कमी करण्यास मदत होते.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार , या एक्सरसाईजमध्ये पोटाजवळ फॅटची एक्स्ट्रा लेअर कमी करता येऊ शकतो.

हेही वाचा: Navratri 2021 : घटस्थापनेला विशिष्ट असा मुहूर्त नाहीच!

काय आहे जपानी टॉवेल टेक्निक?

एक्सरसाईज करताना एक टॉवले आणि मॅटची गरज आहे. ही एक्सरसाईजमध्ये सर्वात आधी मॅटवर झोपा आणि आपले दोन्ही हात -पाय पसरावून शरीरापासून दूर न्या. त्यानंतर एक मिडीयम साईज टॉवेल तुमच्या कंबरेखाली ठेवा जो बेंबीच्या बरोबर खाली असला पाहिजे.

तुमचे पाय खांद्याच्या पातळीवर ठेवा आणि दोन्ही बोटे सतत एकमेकांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. ही एक्सरसाईज रोज 5 मिनीट केल्यास तुमची बॉडी रिलॅक्स होईल.

हेही वाचा: Navratri 2021 : घटस्थापनेला विशिष्ट असा मुहूर्त नाहीच!

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याला मॅजिकल एक्सरसाईजबाबत ऐकायला चांगले वाटते. पण 10 दिवसांमध्ये आपल्याला परफेक्ट अॅब्स मिळवणे शक्य आहे का याची काही खात्री नाही. खरतर जगात कोणतीही एक्सरसाईज इतक्या लवकर फ्लॅट अॅब्स कमी करू शकत नाही. तुमचे बॉडी पोश्चर, कंबरदुखी आणि पोटावरील चरबी काही प्रमाणात कमी करु शकते पण या एक्सरसाईला खूप काळ केल्यानंतर चांगला परिणाम दिसू शकतो

loading image
go to top