नवी स्टायलिश 'जावा पेराक' झाली लॉन्च

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

बीएस-सहा तंत्रज्ञानानुरुप इंजिन जावा पेराकमध्ये आहे. जावा पेराकची बुकिंग 1 जानेवारी 2020 पासून सुरू होणार आहे. नव्या जावा पेराकची किंमत 1.94 लाख रुपये असणार आहे. मागील वर्षी जावाने दोन नवे मॉडेल बाजारात आणले होते.

जावाने आपली नवी मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत आणली आहे. 'जावा पेराक' असे या नव्या मॉडेलचे नाव आहे.

बीएस-सहा तंत्रज्ञानानुरुप इंजिन जावा पेराकमध्ये आहे. जावा पेराकची बुकिंग 1 जानेवारी 2020 पासून सुरू होणार आहे. नव्या जावा पेराकची किंमत 1.94 लाख रुपये असणार आहे. मागील वर्षी जावाने दोन नवे मॉडेल बाजारात आणले होते.

जावा पेराकच्या इंजिन 334 सीसी असून यात सिंगल सिलिंडर आहे. त्याचबरोबर हे लिक्विड कुल्ड डीओएचसी इंजिन असणार आहे. या इंजिनाची क्षमता 30 हॉर्सपॉवरची ताकद आणि 31 एनएमचा टॉर्क निर्माण करण्याची आहे. याआधीच्या जावा आणि जावा फोर्टी टू या दोन मॉडेलपेक्षा जास्त शक्तीशाली मोटर नव्या जावा पेराकमध्ये देण्यात आली आहे. याच्या इंजिनमध्ये 6 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jawa Perak Bobber Launched In India Priced At 1.94 Lakh rupees

टॅग्स