Karwa Chauth 2021 : "सजना है मुझे सजना के लिए... "

करवा चौथला आपला लूक परफेक्ट असावा अशी प्रत्येकीची इच्छा असते
Makeup
MakeupSakal

आज करवा चौथ आहे. आजच्या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया नवऱ्याला दिर्घ आयुष्य मिळावे यासाठी उपवास करतात. संध्याकाळी हा उपवास सोडला जातो. मात्र संध्याकाळी बायका छान नटून थटून तयार होतात. अनेकजणी मेकअप आणि हेअरस्टाईल परफेक्ट असावी यासाठी आग्रही असतात. मात्र तुम्हाला आणखी परफेक्ट लूक हवा असेल तर या टिप्स फॉलो करा

प्राईमर आणि बीबी क्रीम - आज संध्याकाळी तुम्ही जी साडी, ड्रेस घालणार असाल त्यावर मॅचिंग दागिने घाला. छानसा मेकअप करा. मेकअप करताना सुरुवातीला चेहऱ्याला प्रायमर लावा. प्रायमर लावल्याने तुमच्या स्कीनला बेस मिळतो. त्यामुळे चेहरा चमकदार दिसतो. त्यानंतर बीबी क्रीम लावा. हे क्रीम तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या लपवण्याचं काम करून परफेक्ट लूक देते.

makeup
makeupsakal

फाऊंडेशन - प्राईमर नंतर जर बीबी क्रीम लावायचे नसेल तर तुम्ही फाऊंडेशन लावायचा विचार करा. मात्र हे अगदी कमी प्रमाणात लावावे. नाहीतर तुमची त्वचा काळी, कोरडी होण्याचा धोका असतो. तुमच्या त्वचेच्या रंगानुसार तुम्ही फाऊंडेशन निवडावे. चेहऱ्यावर त्याचा पातळ थर लावणे योग्य असते. परफेक्ट दिसण्यासाठी फाऊंडेशन त्वचेला एक योग्य रूप देते.

makeup
makeupSakal

डोळ्यांचा मेकअप - तुमचा मेकअप डोळ्यांच्या मेकअपशिवाय नेहमीच अपूर्ण असतो. डोळ्यांवर आधी काजळ लावा. त्यानंतर वरच्या बाजूला आयलायनर लावा. आयलायनर लावल्यामुळे डोळे मोठे आणि सुंदर दिसतात. हे लावून झाल्यानंतर आयलॅश कलर्स व मस्करा लावा. पापण्यांवर शिमरी किंवा ब्रॉंझ आयशॅडो लावा. आय पेन्सिल वापरून आपल्या भुवया जाड करा,. मेकअप पूर्ण झाल्यानंतर, थोडीशी पावडर लावून सेट करा.

लिपस्टिक- योग्य लिपस्टीक लावून तुमच्या मेकअपला फायनल टच मिळेल. लाल, गुलाबी किंवा कॉफी कलरची लिपस्टिक तुम्ही तुमच्या ड्रेसनुसार वापरू शकता. जर तुम्ही डोळ्यांचा मेकअप हलका केला असेल तर गडद रंगाची लिपस्टीक तुम्हाला चांगली मॅच होईल.

gajra hairstyle
gajra hairstyleesakal

हेअरस्टाईलचा विचार करा- तुम्ही जो लूक करणार असाल त्यानुसार हेअरस्टाईल करा. जर सिल्कची जाड बॉर्डर असलेली साडी नेसणार असाल तर अंबाडा घालून गजरे माळा. किंवा केसांना थोडे कर्लिंग लग्नात ज्याप्रमाणे स्टाइल केली जाते त्याप्रमाणे करू शकता. जर केस पूर्ण मोकळे सोडायचे नसतील तर हाफ अप- हाफ डाऊन स्टाईलचा विचार करा. यामध्ये तुम्ही अर्ध्या केसांना क्लच किंवा पीना लावून सेट करून उरलेले केस मोकळे सोडू शकता. जर तुमचे केस पातळ असतील तर तुम्ही साईड वेणी बाधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com