Best Advice For New Relationships: नव्याने प्रेमात पडणाऱ्यांनी ‘या’ 5 गोष्टी ठेवा लक्षात, लवकरच नाते होईल मजबूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationships

Best Advice For New Relationships: नव्याने प्रेमात पडणाऱ्यांनी ‘या’ 5 गोष्टी ठेवा लक्षात, लवकरच नाते होईल मजबूत

नवीन नातेसंबंधात बोलण्यासाठी बरेच विषय आहेत. एकमेकांच्या आवडी-निवडी, कुटुंब, मित्र इत्यादींबद्दल उत्‍सुकता असते आणि अशा गोष्टी एकत्र शेअर करायला बरं वाटतं. पण, काळाबरोबर नाते घट्ट करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे आणि त्यांचे पालन करणे देखील आवश्यक आहे.

जर तुम्ही तुमचे नाते गांभीर्याने घेत असाल आणि तुमच्या जोडीदारासोबत आयुष्यभर राहायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमचे नाते अधिक मजबूत करू शकता. येथे आम्ही तुम्हाला हे कसे करू शकता ते सांगत आहोत.

अशा प्रकारे नवीन रिलेशनशिप मजबूत करा

एकत्र वेळ घालवा

तुम्ही जितका जास्त वेळ एकत्र घालवाल तितके तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल, परंतु हे आवश्यक नाही की तुम्ही सर्व वेळ एकत्र फिरत राहाल. तुम्ही एकत्र बोर्ड गेम्स खेळू शकता, सकाळी किंवा संध्याकाळी फिरू शकता.

तसेच पुस्तक एकत्र वाचू शकता आणि त्या विषयावर चर्चा करू शकता. इतकंच नाही तर एकत्र गाणी ऐका, स्वयंपाक करणं हाही एकत्र वेळ घालवण्याचा एक मार्ग असू शकतो.

गरजा विचारा

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या गरजा वेळोवेळी विचारत असाल, तर तुम्हाला त्याची चांगल्या प्रकारे ओळख तर होईलच पण तुमच्या जोडीदारालाही तुमच्याशी भावनिक जोड मिळेल. एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वाईट काळात मदत मागून त्यांचे मनही जिंकू शकता.

तुमची भीती, राग आणि भावना व्यक्त करा

तुमची आंतरिक भीती, राग आणि भावना तुमच्या जोडीदारासोबत शेअर करणे तुमच्या नात्यासाठी खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुम्हाला नात्यात असुरक्षित वाटत असेल तेव्हा तुम्ही त्यांना सांगू शकता. यासाठी तुम्ही लेटरची मदत घेऊ शकता.

प्रेमाने राग व्यक्त करा

जर तुम्हाला जास्त राग आला असेल तर तुम्ही स्वतःला शांत होण्याची वाट पाहणे चांगले. एखाद्या गंभीर विषयावर बोलण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून योग्य वेळ मागितल्यास बरे होईल. इतरांना न दुखावता तुम्ही तुमचा राग व्यक्त करू शकता. सॉरी बोलून तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट सांगू शकता.

कौतुक करा

तुमच्या जोडीदाराची रोज प्रशंसा करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे निगेटिव्ह सेल्फ इमेज तुटते आणि जोडीदाराच्या मनात तुमच्यासाठी सकारात्मक विचार येतील.