
Kiss Day 2023 : ‘Kiss एक फायदे अनेक’; वजन कमी करायला किस करेल मदत!
'व्हॅलेंटाईन डे' साजरा करतानाही 'किस डे' साजरा करण्याची प्रथा आहे. चुंबन केवळ जोडपे, प्रेमीयुगुलच करतात असे नाही तर तुम्ही त्या सर्वांना कपाळावर, गालावर प्रेमाने चुंबनही घेऊ शकता. चुंबन एक प्रेमळ शारीरिक हावभाव आहे. यामुळे आनंद वाढतो. परस्पर प्रेम वाढतं.
आजचा हा दिवस केवळ प्रेमी युगलांमधील परस्पर प्रेम दाखवण्यापुरता मर्यादित नाही तर प्रत्येक नात्यातील प्रेम आणि बंध दर्शविण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो. चुंबन केल्याने नाते केवळ गोड आणि मजबूत बनत नाही. तर त्याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत.
जेव्हा आई आपल्या मुलाच्या कपाळाचे चुंबन घेते तेव्हा ती तिचे सर्व दुःख आणि वेदना विसरते. जेव्हा आपण भाऊ-बहीण, मित्र, वडील-मुलगा किंवा जवळच्या व्यक्तीवर आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करतो तेव्हा आपण चुंबन घेऊन व्यक्त करतो.
समोरच्या व्यक्तीवर प्रेम दाखवण्याचा हा एक अतिशय सोपा मार्ग आहे. यातून जवळच्या आणि प्रियजनांबद्दलच्या नात्याची खोली व्यक्त करता येते. अशा स्थितीत 'किस डे' केवळ प्रेमी युगुलांपुरताच मर्यादित ठेवणे योग्य नाही. हा दिवस परस्पर बंध, नातेसंबंधातील अतूट प्रेम देखील प्रतिबिंबित करतो. चुंबनाचे काही आरोग्य फायदे देखील आहेत, जे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
‘हेल्थलाइन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, जेव्हा तुम्ही एखाद्याला किस करता. तेव्हा ती क्रिया तुमच्या मेंदूला काही हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स मेंदूतील हॅपी सेंटर्स सक्रिय करते आणि तुम्हाला किसचा आनंद मिळतो. त्यामुळेच जेव्हा तुम्ही एखाद्याला प्रेमाने किस करता तेव्हा तुम्हाला आनंद होतो. कारण, चुंबनाने फील-गुड हार्मोन्स बाहेर पडतात.
कपाळावरील किस करेल जादू
चुंबन घेतल्याने मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या रसायनांमध्ये ऑक्सीटोसिन, डोपामाइन, सेरोटोनिन हे सर्व घटक आढळतात. नातेसंबंधातील बंध वाढवण्यासाठी ते पुरेसे आहेत. तसेच, तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी करते. म्हणून जेव्हा जेव्हा तुमचा प्रिय व्यक्ती काही कारणाने तणावाखाली असेल तेव्हा त्याला मिठी मारून त्याच्या कपाळावर किंवा गालावर चुंबन घ्या.
आपुलकी निर्माण होते
ऑक्सिटोसिन हा रसायनाचा एक प्रकार आहे. जो जोडप्याशी संबंधित आहे. जेव्हा तुम्ही चुंबन घेता तेव्हा ऑक्सिटोसिन सोडल्याने आपुलकी आणि आसक्तीची भावना निर्माण होते. जेव्हा तुम्ही एखाद्याला प्रेमाने किस करता तेव्हा तुम्हाला नातेसंबंधात समाधान वाटते. दीर्घकालीन नाते टिकवून ठेवण्यास मदत होते.
आजकाल प्रत्येकजण तणावात, चिंतेमध्ये जगत आहे. अशा परिस्थितीत जर एखादी व्यक्ती तणावाखाली असेल तर चुंबन केल्याने तणाव बर्याच प्रमाणात नियंत्रित होतो.
वेदना विसरण्यास मदत
कुटुंबातील एखादा सदस्य किंवा तुमचा मित्र कोणत्याही कारणाने तणावाखाली असेल तर त्याला प्रेमाने मिठी मारण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या कपाळावर चुंबन घ्या. त्याला हलके वाटेल. तो त्याचे दु:ख आणि वेदना विसरेल.
प्राण्यांनाही फायदे
चुंबन घेण्याचे फायदे फक्त मानवांनाच मिळत नाहीत. जेव्हा तुम्ही चुंबन घेता, खेळता, तुमच्या पाळीव प्राण्याला मिठी मारता तेव्हा या सर्व गोष्टी तुम्हाला एकंदरीत निरोगी ठेवू शकतात.
वजन कमी होते
किसमुळे तुम्हाला बरे वाटते. पण, सतत किस केल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. हा किसचा खूप महत्वाचा फायदा मानला जातो. वजन कमी करण्यास मदत होते, रक्तदाब सामान्य राहतो, आजारी पडण्याची शक्यता कमी होते, तणाव, चिंता दूर होते असे फायदे किसचे आहेत.