कोण आहेत Mukesh Ambani यांचे शेजारी?, सगळ्यांकडे आहे अरबोंची संपत्ती

Mukesh Ambani Neighbours: अंबानी राहतात म्हंटलं तर तो परिसरही तसाच खास असणार आणि तिथे राहणारी इतर लोकंही. अंबानी राहत असलेल्या संपूर्ण परिसरातच भारतातील अनेक श्रीमंत लोक राहतात
Mukesh Ambani Neighbours
Mukesh Ambani Neighbours Esakal

Mukesh Ambani Neighbours : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमधील एक महत्वाची व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी Mukesh Ambani. अंबानी या नावाची तशी वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही.

असा एक दिवस नाही की एखाद्या वाहिनीवर किंवा वृत्तपत्रांमध्ये News Papers अंबानींच्या नावाचा उल्लेख नाही. मग ती बातमी त्यांच्या व्यवसायाची असो वा कुटुंबाची. देशातील प्रत्येक व्यक्ती अंबानी कुटुंबाला ओळखतं. Know About Mukesh Ambani multi millionaire neighbours in mumbai

मुकेश अंबानी Mukesh Ambani त्यांच्या कुटुंबियांसोबत मुंबईमध्ये एंटिलिया या त्यांच्या निवासस्थानी राहतात. त्याचं घर दक्षिण मुंबईतील अल्टामाउंट रोडवर आहे. देशातील हा सर्वात श्रीमंत रोड समजला जातो. जगातील सगळ्यात महागड्या घरांपैकी Expensive House एक म्हणजे अंबानींचं हे निवासस्थान आहे.

अर्थात अंबानी राहतात म्हंटलं तर तो परिसरही तसाच खास असणार आणि तिथे राहणारी इतर लोकंही. अंबानी राहत असलेल्या संपूर्ण परिसरातच भारतातील अनेक श्रीमंत लोक राहतात. अंबानीचे शेजारीदेखील त्यांच्या प्रमाणेच अरबपती आहेत. कोण आहेत त्यांचे शेजारी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

राणा कपूर- येस बँकचे  YES Bank फाउंडर राणा कपूर हे अंबानींच्या घराशेजारीच म्हणजेच एंटिलिया शेजारीच राहतात.  राणा कपूर यांनी १२८ कोटींचं रेसिडेंशियल कॉम्प्लेक्स खरेदी केलं आहे. याच ६ लक्झरी अपार्टमेंट्स आहे.

या इमारतीचं नाव खिर्शीदाबाद असं आहे. ज्याची किंमत आता अधिक वाढली आहे. २००४ साली राणा कपूर यांनी येस बँकेची सुरुवात केली होती. ही एक भारतीय खासगी बँक आहे. अशोक कपूर यांच्या सोबत राणा कपूर यांनी या बँकेची सुरुवात केली होती.

नटराजन चंद्रशेखरन- टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन आपल्या संपूर्ण कुटुंबासह याच परिसरात राहतात. काही वर्षांपूर्वीच त्यांनी एका टॉवरमध्ये ११व्या आणि १२व्या मजल्यावर प्रशस्त असा ड्युप्लेक्स फ्लॅट खरेदी केला होता. या घराची किंमत जवळपास १०० कोटी इतकी आहे. 

प्रशांत जैन- सज्जन जिंदाल ग्रुपची कंपनी JSW Energy चे सीईओ देखील भारतीतील एक नावजलेले उद्योजक आणि अरबपती आहेत. ते JSW ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. प्रशांत जैन हे देखील अंबानींच्याच घराशेजारी राहतात. प्रशांत जैन यांनी गेल्या वर्षीच या परिसरात ४५ कोटी रुपयांचा एक ड्युप्लेक्स फ्लॅट खरेदी केला होता. ते संपूर्ण कुटुंबासोबत या घरात राहतात.

हर्ष जैन- ड्रीम ११ चे फाउंडर हर्ष जैनदेखील अंबानींचे शेजारी आहेत. ते त्यांच्या पत्नीसह एका लक्झरी घरात राहतात. हर्ष यांची पत्नी रचना जैन यांनी ७२ कोटी रुपयांना या घराची खरेदी केली होती.

मोतीलाल ओसवाल- अंबानींच्या शेजाऱ्यांमध्ये आणखी एक उद्योजक म्हणजे मोतीलाल ओसवाल, मोतीलाल ओसवाल ट्रस्टने २०२० साली ’33 South’ या टॉवरमध्ये १३व्या आणि १७व्या मजल्यावर असलेल्या ड्युप्लेक्स फ्लॅटची खरेदी केली होती. यावेळी त्यांनी गहे घर १.४८ कोटी प्रति स्क्वेयर फीटच्या हिशोबाने खरेदी केलं होतं. या सुंदर घरामध्ये ते कुटुंबासोबत राहतात.

या शिवाय अंबानीचं निवासस्थान असलेल्या Altamount Road या परिसरात लोधा अल्टामाउंट, The Imperial, twin tower आणि स्कायस्केपर कॉम्प्लेक्स या काही टोलेटंग इमारती आहेत. या टॉवर्समध्ये देखील भारतातील अनेक बडे उद्योगपती, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि खेळाडूंची अलिशान घरं आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com