Salt Pack Trend- Skin Care ट्रेंड पाहून तुम्हीही मिठाच्या पाण्याने तोंड धुताय?.. तर आधी हे तोटे वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिठाच्या पाण्याने चेहेरा धुण्याचे फायदे तोटे

Skin Care ट्रेंड पाहून तुम्हीही मिठाच्या पाण्याने तोंड धुताय?.. तर आधी हे तोटे वाचा

त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रत्येकजणच प्रयत्नशील असतो. त्वचा चांगली रहावी, चेहऱ्यावर ग्लो दिसावा, पुटकुळ्या येऊ नये म्हणून अनेकजण वेगवेगळे प्राॅडक्ट्स वापरत असतात. तर घरगुती उपायांकडेही भर असतो. यात सध्याच्या डिजिटल विश्वात स्किन केअरचे Skin care चे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असतात. दर काही दिवसांनी हे ट्रेंड बदलतात. या ट्रेंडनुसार अनेकजण हे स्किन केअरचे उपाय Skin Care Remedies करून पाहत असतात. तसचं बाजातही स्किन केअरच्या उत्पादनांचा ट्रेंड बदलत राहतो. त्यानुसार अनेकजण कायम बाजारात येणारे नवनवे प्राॅडक्ट घेऊन प्रयोग करत असतात. मात्र प्रत्येक वेळी हे उपाय फायदेशीर असतीलच असे नाही. Know side effects of Using salt for Skin care

व्हायरल होत असलेला स्किन केअरचा एखादा उपाय किंवा ट्रेंडमध्ये असलेलं प्राॅडक्ट प्रत्येकाला सूट करतं असं नव्हे. त्वचेनुसार ते कसं आणि किती प्रमाणात वापरावं हे जाणून घेणं गरजेचं आहे. काही दिवसांपासून मिठाच्या पाण्याने तोंड धुण्याचा किंवा सॉल्ट बाथ आणि स्क्रब तसचं सॉल्ट पॅकचा Salt Pack पर्याय प्रचंड ट्रेंड होतोय.

बाजारातही मिठाचा वापर करून तयार करण्यात आलेले अनेक प्राॅडक्ट उपलब्ध आहेत. मात्र त्वचेसाठी मिठाचा वापर करताना त्याच्या फायद्यांसोबतच त्यामुळे होणार नुकसान समजून घेणं जास्त गरजेचं आहे. मिठाच्या वापरामुळे डेड सेल, पुळ्या आणि तत्वचेचा पोत सुधारतो. मात्र यामुळे काही तोटे देखील आहे.

मिठाचं पाणी त्वचेसाठी धोक्याचं

मिठाचं पाणी जास्त वेळ चेहऱ्यावर राहिल्यास खाज येऊ शकते आणि बारीक पुटकुळ्या येऊ शकतात

कोरडी त्वचा किंवा गजकर्णासारख्या त्वचेच्या समस्या असतील तर जास्त काळ मिठाच्या पाण्याचा संपर्क आल्यास त्रास होवू शकतो.

मिठाच्या पाण्यात विब्रिओ नावाचा बॅक्टेरिया आढळतो ज्यामुळे स्किन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते

तर तुम्हाला त्वचेशी संबधीत कोणताही आजार असेल तर मिठाच्या पाण्याचा वापर टाळावा अन्यथा इन्फेक्शन अधिक वाढू शकतं.

हे देखिल वाचा-

मिठाच्या पाण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. मात्र त्यासाठी आधी त्यामुळे काय नुकसान होवू शकतं हे जाणून घेतल्यानंतरच त्याचा वापर करावा. मिठाच्या पाण्याचा त्वचेसाठी योग्य वापर कसा करावा आणि त्यामुळे कोणते फायदे होवू शकतात हे पाहुयात.

त्वचेसाठी जर तुम्हाला मिठाचा वापर करायचा असेल तर तुम्ही अँटी इंफ्लामेट्री मास्क बनवू शकता. यासाठी तुम्हाल मीठ, पाणी आणि मध एकत्रित करून मास्क तयार करायचा आहे. हा मास्क चेहऱ्यावर लावून १०-१५ मिनिटांमध्येच चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. हा मास्क जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवू नये.

सी सॉल्टचा किंवा सी वॉटर म्हणजेच समुद्राच्या पाण्याचा तुम्ही स्क्रब म्हणूनही वापर करू शकता. यासाठी मात्र फक्त सी वॉटर न घेता यात अर्धी वाटी नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑईल मिसळून ते चेहऱ्यावर स्क्रब करावं. यानंतरही चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. चेहरा कोरडा करून मॉइस्चराइझर नक्की लावा.

तुम्ही सॉल्टबाथही घेऊ सकता. यासाठी आंघोळीच्या पाण्यात केवळ २ चमचे मीठ मिसळा आणि या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ करताना या पाण्याने चांगल मसाज करा यामुळे शरिरावरील चिकटपणा दूर होईल.

तुमचे केस तेलकट असतील तर मिठाच्या पाण्याने केस धुणं फायदेऱील ठरेल. मिठाच्या पाण्याने केस धुतल्यास तेलकटपणा दूर होईल केसा चमकतील. ऑयली म्हणजेच तेलकट त्वचेसाठीदेखील मिठाचं पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरू शकतं.

मिठाच्या पाण्याचा वापर टोनर म्हणूनही करू शकता. Natural tonner for Skin मिठाच्या पाण्यामुळे त्वचेवरील छिद्र कमी होतात आणि अतिरिक्त तेल निघण्यास मदत होते. त्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि फ्रेश दिसते. मात्र मिठाच्या पाण्याचा टोनर म्हणून वापर करताना पाण्यात योग्य प्रमाणात मीठ मिसळा. जास्त मिळाचा वापर करू नये.

मिठाचं पाणी तुमच्या त्वचेला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करतं. यामुळे त्वचेमधील घाण बाहेर फेकली जाते. त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते.

मिठाच्या पाण्याचे त्वचेसाठी फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत. एकंदर कोरडी त्वचा असणाऱ्यांनी हे उपाय करण्यापूर्वी काळजी घ्यावी. यासाठी तुम्ही त्वचेवर पॅच टेस्ट करू शकता. तर तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी मिळाच्या पाण्याचा वापर करणं त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. तर मिठाचा वापर करून तयार करण्यात आलेले बाजारातील उत्पादनं वापरण्यापूर्वी जर तुम्हाला त्वचेच्या समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे प्राॅडक्ट खरेदी करा.