खादीचा ट्रेंड फुटवेअरमध्येही; KVIC ने केले लॉन्चिंग, ऑनलाईन खरेदी शक्य

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

खादी बुट किंवा सॅन्डलच्या प्रत्येक जोडीची किंमत 1100 ते 3300 पर्यंत ठेवण्यात आली आहे. सुरवातीला महिलांच्या फुटवेअर मध्ये 15 डिझाईन तर पुरुषांच्या फुटवेअरमध्ये 10 डिझाईन लॉन्च केल्या आहेत' अशी माहिती गडकरी यांनी यावेळी बोलताना दिली. या फुटवेअरवर मधुबनी पेंटींग सह देशभरातील विविध प्रकारचे पेंटींगमध्ये डिझान्स उपलब्ध असणार आहे. 

दिल्ली : खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) भारतातील सर्वात पहिले खादी फॅब्रिक फुटवेअर बुधवारी व्हिडिओ कॉन्फसिंगद्वारे  लॉन्च करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थितीत होते. हे फुटवेअर खादी व ग्रामोद्योग आयोगा (KVIC) च्या पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध असतील.

गडकरी यांनी खादी कारगिरांना आकर्षक फुटवेअर डिझाईन केल्याबद्दल शुभेच्छा देत, त्यांच्या प्रयत्नांमुळे खादी उद्योग आणि स्थानिक रोजगार वाढण्यास मदत होईल'' असे सांगितले. 
 

Chairman KVIC on Twitter: "Hon'ble Minister MSME Shri @nitin_gadkari ji &  Hon'ble Shri @pcsarangi ji launched India's First Khadi Fabric Footwear, a  historic step towards Local to Global.Exquisite fabric like Patola &

''खादी बुट किंवा सॅन्डलच्या प्रत्येक जोडीची किंमत 1100 ते 3300 पर्यंत ठेवण्यात आली आहे. सुरवातीला महिलांच्या फुटवेअर मध्ये 15 डिझाईन तर पुरुषांच्या फुटवेअरमध्ये 10 डिझाईन लॉन्च केल्या आहेत' अशी माहिती गडकरी यांनी यावेळी बोलताना दिली. या फुटवेअरवर मधुबनी पेंटींग सह देशभरातील विविध प्रकारचे पेंटींगमध्ये डिझान्स उपलब्ध असणार आहे. 

Gadkari launches Khadi footwear, KVIC targets Rs 5,000 crore business

फुटवेअर मार्केटमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर 
फुटवेअर सेक्टरमधील रोजगार निर्मिती आणि निर्यातीमध्ये भारताच्या क्षमतेबाबत बोलताना, गडकरी म्हणाले की, चीन आणि अमेरिकानंतर भारत जगात फुटवेअर निर्मीतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. फुटवेअर सेक्टरमध्ये 1.45 लाख करोड रुपयांच्या उलाढाली होतात. यामध्ये देशांर्गत 85 हजार करोडच्या उलाढाली होतात तर निर्यातीमध्ये 45 ते 55 हजार करोड रुपयांच्या उलाढाली होतात.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KVIC launches first khadi fabric footwear in India