जाणून घ्या तुमच्या हेअर फॉलची कारणं आणि घरगुती उपाय!

टीम ई-सकाळ
शनिवार, 14 डिसेंबर 2019

केस गळतीवर इलाज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात प्रचंड बदल करणावे लागतील. आराहाच्या वेळा पाळाव्या लागतील.

हेअर फॉल हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात. अनुवंशिकतेपासून हार्मोन्समधील बदल त्याचं कारणं असू शकतं. पण, थोडेफार केस गळणं, सामान्य असू शकतं. अर्थात त्याचं प्रमाण वाढलं तर मात्र, चिंता वाटू लागते. तेव्हा मुळात केस गळतातच का? आणि त्यावर घरगुती उपाय योजना काय आहेत? याची आपण माहिती घेऊया. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

केस गळतीची कारणं

ताण-तणाव - तुम्ही जण कामाच्या किंवा कौटुंबिक किंवा इतर कोणत्याही कारणानं तणावाखाली असाल तर, तुमचे केस गळू शकतात. अगदी तुमचे शारिरीक श्रम जास्त होत असतील तरीही ते केस गळतीचं कारणं असू शकतं. 

Image may contain: 1 person

थायरॉइड - थायरॉइडच्या पेशंट्समध्ये केस गळती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं दिसून आलंय. हायपोथायरॉइडिजम आणि हायपरथायरॉइडिजम दोन्ही प्रकारांमध्ये संबंधित व्यक्तीचे केस गळतात.

जिन्स - तुमच्या केसांचा रंग, लांबी आणि त्यांची घनता ही तुमच्या शरिरातील जिन्सवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. 

- जंकफूडचे आरोग्यावरील घातक परिणाम​

काय आहेत घरगुती उपाय?

केस गळतीवर इलाज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात प्रचंड बदल करणावे लागतील. आराहाच्या वेळा पाळाव्या लागतील. त्याचबरोबर विशिष्ठ पदार्थांचं सेवनही करावं लागले. इथं आम्ही केसांना बाहेरून कशाप्रकार प्रोटिन देता येईल, याची माहिती देत आहोत. 

ग्रीन टी - ग्रीन टी हे उत्तम अँटी-ऑक्सिटंड म्हणून ओळखले जाते. ते केसांच्या वाढीसाठी उत्तम असते. ग्रीन टी प्यायल्यानंतर टी बॅग फेकून देऊ नका. पाण्यात एक मिनिट उकळा आणि तुमच्या केसांच्या मुळांना लावा. 30 ते 40 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा 

- हिवाळ्यातील त्वचेची काळजी 

अंडी - अंड्यांतील पांढरा भाग प्रचंड प्रोटिनची क्षमता असलेला असतो. त्यात चमचाभर ऑलिव्ह ऑईल आणि मध टाकून ते केसांच्या मुळांना लावावे आणि 20-30 मिनिटांनी केस धुवावेत. 

कांदा - कांद्यात मोठ्या प्रमाणावर सल्फर (गंधक) असतं. त्यामुळं केसांची वाढ होण्यास मदत होते. कांद्याचा रस 20 मिनिटे केसांना लावून केस धुवावेत.

आवळा - केसांची घनता वाढवण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून आवळ्याचा पर्याय सांगितला जातो. दोन चमके आवळा पावडर आणि दोन चमके शिकेकाई पावडर मिक्स करून त्याची पेस्ट 40 ते 45 मिनिटे केसांच्या मुळांना लावावी. आवळ्यातून केसांच्या मुळांना क जीवनसत्व आणि लोह मिळतं. 

- व्हॉट्सअप ग्रुपचा आलाय कंटाळा? ग्रुप सोडण्यासाठी या आहेत 5 ट्रीक्स!

लिंबाचा रस - लिंबाचा रस 15-20 मिनिटे केसांच्या मुळांना लावावा. यामुळं तुमचे केस गळणे थांबेल त्याचबरोबर डँड्रफवरही इलाज होईल. 

खोबरेल तेल - खोबरेल तेल हे केसांवरच्या सर्व समस्यांवरचा उपाय सांगितले जाते. खोबरेल तेला एक चमचा मध आणि एक चमका लिंबाचा रस मिसळून केसांना लावावे. एक तासानंतर केस धुवावेत. यामुळे डँड्रफही नाहिसा होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Learn the causes and home remedies for hair fall

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: